AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक है तो सेफ है… मोदी है तो मुमकीन है… देवेंद्र फडणवीस यांनी मांडली नव्या सरकारची लाईन

देशाला एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं आहे. या अमृतमहोत्सवी वर्षात आपलं सरकार स्थापन करत आहोत, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

एक है तो सेफ है... मोदी है तो मुमकीन है... देवेंद्र फडणवीस यांनी मांडली नव्या सरकारची लाईन
devendra fadnavis
| Updated on: Dec 04, 2024 | 2:37 PM
Share

Devendra Fadnavis BJP Legislative Party Leader : राज्यातील सत्तास्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची शपथविधी पार पडणार आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आता 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील.

यापूर्वी भाजपच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा भाषण केले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो, असा कौल दिला आहे, असे म्हटले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारची नवी लाईनही मांडली.

देवेंद्र फडणवीसांनी मांडली सरकाची नवीन लाईन

आपण एकमताने गटनेता म्हणून माझी निवड केली. त्याबद्दल आभार. या निवड प्रक्रियेसाठी आलेले रुपानी आणि सीतारामण यांचं मनापासून आभार मानतो. यावेळची निवडणूक ही अतिशय ऐतिहासिक होती. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी म्हणेल या निवडणुकीने एक गोष्ट ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है. मोदींच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका लोकसभेनंतर हरियाणापासून सुरू झाली. महाराष्ट्राने जो कौल दिला आहे. खरं म्हणजे राज्यातील जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो,. असा कौल दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अमृतमहोत्सवी वर्षात आपलं सरकार स्थापन करतोय – देवेंद्र फडणवीस

विशेषत: या संपूर्ण प्रक्रियेत आपल्यासोबत पूर्णपणे तनमनाने आपल्यासोबत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मनापासून आभार मानतो. आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि सर्व मित्र पक्षांचे मनापासून आभार मानतो. हे महत्त्वाचं वर्ष आहे. एकीकडे आपण ज्या प्रक्रियेतून निवडून येतो, ती प्रक्रिया संविधानाने दिली. बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. हे महत्त्वाचं वर्ष आहे. देशाचे पंतप्रधान मोदी हे नेहमी सांगतात कोणत्याही धर्मग्रंथासाठी माझ्यासाठी संविधान सर्वात महत्त्वाचं आहे. एक असं संविधान त्याने प्रत्येक भारतीयांना मोठं होण्याचा अधिकार दिला. देशाला एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं आहे. या अमृतमहोत्सवी वर्षात आपलं सरकार स्थापन करत आहोत, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

हिंदुस्थानात मोगली आक्रमणानंतर आपल्या श्रद्धास्थानाचं पुनरुत्थान केलं त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. बिरसा मुंडा यांचीही १२५ जयंतीचं वर्ष आहे. वाजपेयी यांचं देखील हे १०० वं जयंती वर्ष आहे. या महत्त्वाच्या जयंती वर्षात जनतेने महायुतीवर जबाबदारी दिली आहे. इतका मोठा जनादेश आपल्याला जनतेने दिला आहे. या जनादेशातून एवढंच म्हणेल आनंद आहे, असेही ते म्हणाले.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?