भाजपचे नागपूरचे नगरसेवक अचानक मुंबईकडे रवाना, मुख्यमंत्र्यांचं बोलावणं; काय घडतंय?

देवेंद्र फडणवीस विधान परिषद निवडणुकीसाठी ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. नागपूरच्या भाजप नगरसेवकांना त्यांनी 'डिनर पे चर्चा'साठी बोलावले आहे. महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असूनही, दगाफटका टाळण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे. 18 जून रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी नगरसेवकांची मने वळवून महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित करणे हा यामागचा उद्देश आहे.

भाजपचे नागपूरचे नगरसेवक अचानक मुंबईकडे रवाना, मुख्यमंत्र्यांचं बोलावणं; काय घडतंय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवकांना 'डिनर पे चर्चा'साठी बोलावलं आहे.
| Updated on: Jun 15, 2026 | 12:51 PM

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत महायुतीचे जवळपास 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. इतर उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. महायुतीकडे पुरेसं संख्याबळ आहे. गणिताच्या आकड्यात महायुती मजबूत आहे. मात्र कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीकडून खबरदारी घेतली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. फडणवीस यांनी नागपुरातील नगरसेवकांना जेवणासाठी आमंत्रण दिलं आहे. या नगरसेवकांशी डिनर पे चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या डिनर पे चर्चाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी या डिनर पे चर्चेची माहिती दिली आहे. नागपूरातील भाजपच्या नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जेवनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. येत्या 18 तारखेला नागपुरात विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे डिनर पे चर्चा होणार आहे. 17 तारखेला वर्षावर मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना जेवणासासाठी निमंत्रण दिलं आहे. 16 तारखेला तारखेला रामभाऊ माळगी प्रबोधिनी येथे मुख्यमंत्री नगरसेवकांचं एक सत्र घेणार आहेत, अशी माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे.

काही गोव्यात, तर काही मुंबईकडे

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं जेवणाचं आवतन आल्यानंतर नागपूरातील काही नगरसेवक मुंबईला निघाले आहेत. मुंबईत पक्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नगरसेवक मुंबईला निघाले आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बहुतांश नगरसेवक आधीच सहलीला गोव्याला गेले आहेत. पण जे भाजप नगरसेवक गोव्याला जाऊ शकले नाही, ते आज मुंबईसाठी निघाले आहेत. आता भाजपचे सर्व नगरसेवक विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी परत येणार आहेत.

कधी आहे निवडणूक?

राज्यातील विधान परिषदेची निवडणूक येत्या 18 तारखेला होत आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

असा आहे कार्यक्रम

अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून

उमेदवारांच्या अर्जांची छाननी- 2 जून

अर्ज माघारीची मुदत- 4 जून

मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)

मतमोजणी- 22 जून

कोण आलं बिनविरोध?

ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना (शिंदे)

रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – अजितदादा गट

पुणे – विक्रम काकडे – अजितदादा गट

वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप

यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना (शिंदे)

अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप

Follow Us