AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी स्वत: स्टँडअप कॉमेडी पाहतो पण..; प्रणित मोरे वादादरम्यान काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोवरून सुरू असलेल्या वादादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान प्रणित मोरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला समन्स बजावण्यात आले आहेत.

मी स्वत: स्टँडअप कॉमेडी पाहतो पण..; प्रणित मोरे वादादरम्यान काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadnavis and Pranit MoreImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 12, 2026 | 1:35 PM
Share

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा एकदा त्याच्या शोमुळे आणि त्यातील आक्षेपार्ह विनोदामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या शोमधील हिमांशू जांग्रा नावाच्या तरुणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यात त्याने महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 370 रुपयांच्या बिर्याणीच्या बदल्यात मुलीकडून वसुलीची भाषा करणाऱ्या हिमांशू जांग्रा आणि कॉमेडियन प्रणित मोरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण वादादरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टँडअप कॉमेडीवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे स्वैराचारामध्ये बदलू नये, असं ते म्हणाले.

काय म्हणाले फडणवीस?

“आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीला भारताच्या संविधानाने अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. पण त्याचवेळी अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे स्वैराचारामध्ये बदलू नये, अशा प्रकाराची अपेक्षासुद्धा भारताच्या संविधानाने व्यक्त केली आहे. ज्यावेळी समाजाची मर्यादा तोडून आपण अभिव्यक्ती करतो, त्यावेळी जे इतरांचं स्वातंत्र्य आहे, जे इतरांना आदराने राहण्याचं स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे, त्यावर आपण अतिक्रमण करतो. म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकालाच अभिव्यक्तीचा अधिकार आहे, स्टँडअप कॉमेडियन्सला तर आहेच,” असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी स्वत:देखील स्टँडअप कॉमेडीचे शोज पाहत असल्याचं म्हटलंय. “मी स्वत: स्टँडअप कॉमेडी मोठ्या प्रमाणात ऐकतो, ते मनोरंजनाचं साधन आहे. पण ते होत असताना मर्यादा काय आहेत, यादेखील आपण पाळल्या पाहिजेत. समाजाच्या इतर लोकांच्या आदरपूर्वक जगण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीच अतिक्रमण करू नये, अशी माझी अपेक्षा आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र सायबरच्या सूचना

दरम्यान भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार प्रणित मोरे, हिमांशु जांग्रा आणि डॉ. सेजल पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच आपले जबाब नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबर न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देणारे समन्ससुद्धा या तिघांना बजावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सायबरनेदेखील कंटेंट क्रिएटर्स आणि डिजिटल इन्फ्लुएन्सर्सना ऑनलाइन कंटेंट तयार करताना कायदेशीर चौकटींचं पालन करण्याचं आवाहन करणारी सूचना जारी केली आहे.

Follow Us
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी