AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग

मोठी बातमी समोर येत आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

सर्वात मोठी बातमी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग
Devendra Fadnavis Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 25, 2026 | 3:09 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या 1 महिन्यापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती. त्यासाठी 20 जुलै रोजी संसदेवर भव्य असा मोर्चा देखील काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये विद्यार्थी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, तसेच आंदोलकांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला, यामुळे देशभरात वातावरण चांगलंच तापलं.

कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला, देशभरातून विद्यार्थी जंतर मंतरवर दाखल झाले आणि या आंदोलनाने व्यापक रूप घेतलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरू केलं हतो. तब्बल 25 दिवस त्यांनी उपोषण केलं, त्यानंतर 26 व्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण सोडलं. परंतु जरी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं असलं तरी देखील धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाही, तोपर्यंत  आंदोलन सुरूच राहणार असल्याचं कॉकरोच जनाता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी जाहीर केलं होतं.

अखेर शुक्रवारी पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये देखील कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम होतं. सरकारकडून त्यांना शनिवारी दुपारपर्यंतचा वेळ मागण्यात आला होता, मात्र त्याआधीचा आता धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हे कॉकरोच जनाता पार्टीला मिळालेलं मोठं यश मानलं जात आहे.

दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा खळबळजनक दावा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?