AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनी अमावस्या… नारंगी रुमाल, बैलगाडी आणि भोंदू बाबाचा खूनी खेळ… धुळ्यातील घटनेने संपूर्ण देश हादरला

धुळ्यातील साक्री तालुक्यात शनी अमावस्येला एका भोंदू बाबाने दुहेरी हत्याकांड घडवले. विवाहित महिलेवर अत्याचार प्रयत्न करत खून केल्यानंतर, पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने तिच्या मित्राचाही गळा आवळला. नारंगी रुमाल आणि बैलगाडीच्या मदतीने पोलिसांनी आरोपी योगेश खैरनारला अटक केली. या घटनेने भोंदूगिरीचा भीषण चेहरा समोर आला असून, संपूर्ण देश हादरला आहे.

शनी अमावस्या... नारंगी रुमाल, बैलगाडी आणि भोंदू बाबाचा खूनी खेळ... धुळ्यातील घटनेने संपूर्ण देश हादरला
धुळ्यातील घटनेने संपूर्ण देश हादरला
| Updated on: May 17, 2026 | 2:13 PM
Share

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची घटना घडली असून या घटनेने जिल्हा हादरला आहे. एका भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने एका विवाहित महिलेसह तरुणाचा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी भोंदू योगेश खैरनार याला अटक केली असून त्याच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनी अमावस्येच्या रात्रीच त्याने हा खूनी खेळ खेळल्याची माहिती उघड झाल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. भोंदू खरातच्या लैंगिक प्रकरणानंतर आता भोंदू खैरनारने केलेल्या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वर्धाने शिवारात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. एका फायनान्स कंपनीत डेली कलेक्शनचे काम करणाऱ्या जयश्री काकुस्ते (वय 25) या महिलेचा मृतदेह टेंभे वर्धाने शिवारात आढळून आला. दरम्यान जयश्री ही जैताने शिवारातील एका भोंदूकडे पूजेसाठी गेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी भोंदू योगेश खैरनार याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. यावेळी भोंदू योगेश खैरनार याने आपला गुन्हा कबूल केला.

जबरदस्ती केली, किंकाळ्या मारल्या

आपल्याकडे पूजेसाठी आलेल्या जयश्री काकुस्ते या विवाहितेला पूजेनंतर घरी सोडण्यासाठी जात असताना भोंदूने तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जयश्रीने प्रतिकार करत किंकाळ्या मारल्याने तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली भोंदू योगेश खैरनार याने पोलिसांना दिली आहे. तर जयश्री सोबत पूजेसाठी आलेल्या तिचा मित्र अक्षय सोनवणे याच्यामुळे आपलं बिंग फुटू नये म्हणून अक्षयच्या डोक्यात रॉड टाकून त्याचा खून केलाच पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी संशयित भोंदू बाबा योगेश खैरनार याला अटक केली असून त्याच्याविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान निजामपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नारंगी रुमालाने…

शनी अमावस्येच्या रात्री जयश्री आणि अक्षय पूजा करण्यासाठी भोंदू योगेशच्या आश्रमात गेले होते. पण ते परत आलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रायपूर-भडगावर रोडवर जयश्रीचा मृतदेहच मिळाला. तिचा चेहरा कपड्याने झाकलेला होता. बाजूला दुचाकी उभी होती. पोलिसांना आधी हा रस्ते अपघात वाटला होता. पण पोलिसांनी अधिक खोलवर तपास केला असता हा खून असल्याचं उघड झालं. जंगलात एका तरुणाचा मृतदेह दफन केलेला दिसला. हा तरुण अक्षय होता. अक्षयच्या मृतदेहा शेजारीच एक नारंगी रुमाल सापडला आणि हा रुमालच हे प्रकरण सोडवण्यासाठी उपयोगी पडला.

पोलिसांनी श्वानांची मदत घेतली. त्यांनी श्वानांना या नारंगी रुमालाचा वास दिला. त्यानंतर हे श्वान थेट भोंदू बाबा योगेश खैरनारच्या आश्रमात गेले. त्यानंतर पोलिसांनी भोंदूबाबाला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना वेगळ्याच कहाण्या सांगितल्या. पण पोलिसांनी वर्दीचा खाक्या दाखवताच भोंदू खैरनार पोपटासारखा बोलायला लागला. त्यानंतर त्याने सर्व घटना सांगितली आणि पोलिसांनी या खूनी बाबाला अटक केली.

त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे. अक्षयचा मृतदेह आश्रमाजवळच्या उभानार्डी जंगलात त्याने दफन केला होता. अक्षयचा मृतदेह नेण्यासाठी त्याने बैलगाडीचा वापर केला होता. पोलिसांना मृतदेह दफन केलेल्या जागी बैलगाडीच्या चाकांचे निशाण आढळून आले आहेत. पोलिसांनी आरोपीला पकडलं असून आता वेगवेगळ्या अँगलने या घटनेचा तपास करत आहे.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...