Dhule : राज्यात 105 नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर, साक्रीसाठी 21 डिसेंबरला मतदान

साक्री नगरपरिषदेच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजले आहे. 21 डिसेंबरला नगरपरिषदेचं मतदान होत आहे.

Dhule : राज्यात 105 नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर, साक्रीसाठी 21 डिसेंबरला मतदान

धुळे : वर्षभरापासून सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या साक्री नगरपरिषदेच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजले आहे. 21 डिसेंबरला नगरपरिषदेचं मतदान होत आहे. या नगरपरिषदेसाठी दुसऱ्यांदा ही मतदान प्रक्रिया होणार असून यात नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर गेलेली

2015 मध्ये ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर प्रथम पाच वर्षांचा कार्यकाळ गतवर्षी नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे वर्षभरापासून ही निवडणूक लांबणीवर गेली होती. दरम्यानच्या काळात प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून नगरपरिषदेवर प्रशासक नमून कामकाज केले जात होते. सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी केली जात होती, मात्र निवडणुकीचा निश्चित कार्यक्रम जाहीर होत नसल्याने ही पूर्वतयारी आणि त्यासाठीचा खर्च किती दिवस करावा हा इच्छुक उमेदवारांसह राजकीय पदाधिकाऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला होता .

105 नगरपरिषदेच्या निवडणुका होणार

अशातच काल निवडणूक आयोगाने राज्यातील 105 नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यात साक्रीचाही समावेश असून , यानुसार 21 डिसेंबरला मतदान  आणि दसऱ्याच दिवशी 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. निवडणुकीत अर्ज दाखल करण्यास 1 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

नगरपंचायतीसाठी प्रभागनिहाय आरक्षण असेल. एक सर्वसाधारण प्रभाग, दोन सर्वसाधारण स्त्री प्रभाग ,तीन अनुसूचित जमाती स्त्री , प्रभाग चार अनुसूचित जमाती , प्रभाग पाच सर्वसाधारण स्त्री , प्रभाग सहा ना.मा.प्र. स्त्री प्रभाग,  सात सर्वसाधारण स्त्री, प्रभाग आठ अनुसूचित जमाती स्त्री, प्रभाग नऊ सर्वसाधारण, प्रभाग दहा सर्वसाधारण, प्रभाग अकरा सर्वसाधारण स्त्री, प्रभाग बारा ना.मा.प्र, प्रभाग तेरा सर्वसाधारण, प्रभाग चौदा ना.मा.प्र.स्त्री, प्रभाग पंधरा अनुसूचित जाती , प्रभाग सोळा सर्वसाधारण स्त्री, प्रभाग सतरा ना.मा.प्र अशी प्रभागरचना करण्यात आली आहे.

काँग्रेसला डावलणं म्हणजेच फॅसिस्ट वृत्तीला बळ देणं; बाळासाहेब थोरातांचा ममतादीदींवर निशाणा

Nashik| इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही…पांढरपट्टे यांच्या गझल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

Nashik Sahitya Sammelan ‘ऐसी अक्षरे’मध्ये पालवांची कॅलिओग्राफी रंगली…!

Published On - 3:55 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI