Gutkha Siezed : धुळ्यात दोन कोटी रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त

| Updated on: Apr 18, 2022 | 1:18 AM

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने चार कंटेनरमधून दिल्लीतून महाराष्ट्रात तस्करी होत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना सूचना देऊन कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

Gutkha Siezed : धुळ्यात दोन कोटी रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त
धुळ्यात दोन कोटी रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त
Image Credit source: TV9
Follow us on

धुळे : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला कोट्यवधीचा गुटखा (Gutkha) स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जप्त (Siezed) करण्यात आला आहे. या कारवाईत 4 कंटेनर वाहनासह एकूण 1,90,74,280 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. साबिर मजिद खान, शकील अहमद लियाकत अली, रुकमोद्यीन अयुब खान, मुस्सलिम रुजदार, नसिम खान अली मोहम्मद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात पोना गौतम राजेंद्र यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. हा गुटखा दिल्लीतून धुळे मार्गे मुंबईत आणला जात होता. (Gutkha worth Rs 2 crore seized from local crime branch in Dhule)

दिल्लीहून धुळे मार्गे मुंबईत आणला जात होता गुटखा

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने चार कंटेनरमधून दिल्लीतून महाराष्ट्रात तस्करी होत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना सूचना देऊन कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. सदर आदेशानुसार पोलिस या चार कंटेनरचा शोध घेत होते. यावेळी आवी गावाच्या पुढे पुरमेपाडा गावाजवळ नमूद चारही कंटेनर एका मागे एक जात असल्याचे दिसले. पोलिस पथकाने या कंटेनरचा पाठलाग करत अडवले. कंटेनर चालकांकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी चारही कंटेनर मोहाडी नगर पोलिस ठाण्याच्या आवारात आणून तपासणी केली असता त्यात 1,30,49,280 रुपये किंमतीचा 4K स्टार व SHK सुंगधित पानमसाला तंबाखू 60,00,000 रुपये किंमतीचे एकूण 4 कंटेनर आणि 25,000 रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 5 मोबाईल फोन असा एकूण 1,90,74,280 रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. (Gutkha worth Rs 2 crore seized from local crime branch in Dhule)

इतर बातम्या

Bhayander Shivsena Dispute: मीरा भाईंदरमध्ये शिवसेना शहर प्रमुखाला महिला शिवसैनिकांकडून मारहाण

Mangesh Kudalkar : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या, कारण अस्पष्ट; पोलीस तपास सुरु