Ulhasnagar Crime : आक्षेपार्ह फोटो असल्याच्या संशयातून डॉक्टरने सुपारी देऊन नर्सचा मोबाईल चोरला

उल्हासनगरच्या सी ब्लॉक परिसरात लाईफ केअर हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका नर्सच्या मोबाईलमध्ये हॉस्पिटलमधील डॉ. शहाबुद्दीन शेख याचे अन्य एका महिलेसोबतचे आक्षेपार्ह फोटो असल्याचा संशय डॉक्टरला होता. या संशयातून त्याने या नर्सचा मोबाईल चोरून तो नष्ट करण्याचा डाव आखला.

Ulhasnagar Crime : आक्षेपार्ह फोटो असल्याच्या संशयातून डॉक्टरने सुपारी देऊन नर्सचा मोबाईल चोरला
आक्षेपार्ह फोटो असल्याच्या संशयातून डॉक्टरने सुपारी देऊन नर्सचा मोबाईल चोरलाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 9:01 PM

उल्हासनगर : नर्सच्या मोबाईलमध्ये आपले आक्षेपार्ह फोटो असल्याच्या संशयातून एका डॉक्टरने सुपारी देऊन नर्सचा मोबाईल (Mobile) चोरल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. मोबाईल चोरल्यानंतर तो फोडत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलिसांनी डॉक्टरसह दोघांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. उल्हासनगरच्या सी ब्लॉक परिसरात लाईफ केअर हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका नर्सच्या मोबाईलमध्ये हॉस्पिटलमधील डॉ. शहाबुद्दीन शेख याचे अन्य एका महिलेसोबतचे आक्षेपार्ह फोटो असल्याचा संशय डॉक्टरला होता. या संशयातून त्याने या नर्सचा मोबाईल चोरून तो नष्ट करण्याचा डाव आखला. (The doctor stole the nurse mobile phone on suspicion of having an offensive photo in ulhasnagar)

मोबाईल चोरण्यासाठी 10 हजारांची सुपारी

डॉक्टरने एका मध्यस्थाच्या माध्यमातून सराईत गुन्हेगार आरिफ खान याला या नर्सचा मोबाईल चोरण्यासाठी 10 हजार रुपयांची सुपारी दिली. त्यानंतर आरिफ याने अरशद खान या तरुणाला 2 हजार रुपये देऊन या नर्सचा मोबाईल खेचायला सांगितला. दरम्यानच्या काळात 4 एप्रिलपासून ही नर्स सुट्टीवर गेली होती. त्यामुळे 9 एप्रिल रोजी डॉ. शहाबुद्दीन याने या नर्सला फोन करून हॉस्पिटलला बोलावलं. यादिवशी आरोपी अरशद याने या नर्सचा मोबाईल चोरण्यासाठी तिचा पाठलाग केला. मात्र तिने घरापासून हॉस्पिटलपर्यंतच्या प्रवासात मोबाईल काढलाच नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी 10 एप्रिल रोजी पुन्हा एकदा अरशद याने या नर्सचा पाठलाग सुरू केला. रस्त्यात या नर्सने तिचा मोबाईल काढताच अरशद याने या नर्सचे केस ओढत तिचा मोबाइल खेचून तिथून पळ काढला. या घटनेनंतर संबंधित नर्सने मध्यवर्ती पोलिस ठाण्यात मोबाईल चोरण्यात आल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी तांत्रिक तपास करून अरशद याला बेड्या ठोकल्या.

आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

अरशद याला अटक केल्यानंतर वरवर फक्त मोबाईल चोरीचा गुन्हा वाटत असलेल्या या गुन्ह्यात वेगळीच कहाणी समोर आली. ज्यामध्ये हॉस्पिटलच्या डॉक्टरनेच सुपारी देऊन नर्सचा मोबाईल चोरायला लावल्याचं समोर आलं. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी डॉ. शहाबुद्दीन शेख याच्यासह आरिफ खान आणि मोबाईल चोरणारा अरशद खान या तिघांना अटक केली. तर आणखी एक आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात संबंधित नर्सचा चोरलेला तुटलेल्या अवस्थेतला मोबाईल सुद्धा पोलिसांनी जप्त केला असून अटक केलेल्या सर्व आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. (The doctor stole the nurse mobile phone on suspicion of having an offensive photo in ulhasnagar)

इतर बातम्या

Pune Crime : पुण्यात हृदयाचा ठोका चुकवणारी घटना, तीन वर्षाच्या चिमुकलीची पित्याकडून निर्घृण हत्या

Chandrapur Fire : चंद्रपूरमधील सिंदेवाही येथे वन विभागाच्या लाकूड डेपोला आग, लाखोंचे नुकसान

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.