Pune Crime : पुण्यात हृदयाचा ठोका चुकवणारी घटना, तीन वर्षाच्या चिमुकलीची पित्याकडून निर्घृण हत्या

जितेंद्र हा चालक म्हणून काम करतो. तो मूळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. तर, पत्नी गृहिणी असून, ती गोदिंया जिल्ह्यातील आहे. त्यांचा जानेवारी 2022 मध्ये विवाह झाला होता. तत्पूर्वी जितेंद्र याची पत्नी हिचा पहिला विवाह झालेला आहे. तिला तीन वर्षांची मुस्कान ही मुलगी असल्याचे पती जितेंद्रला सांगितले होते.

Pune Crime : पुण्यात हृदयाचा ठोका चुकवणारी घटना, तीन वर्षाच्या चिमुकलीची पित्याकडून निर्घृण हत्या
तीन वर्षाच्या चिमुकलीची पित्याकडून निर्घृण हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 8:22 PM

पुणे : अनैतिक संबंधातून जन्म झाल्याच्या संशयावरून पोटच्या तीन वर्षीय चिमुकलीचा पित्याने खाली डोके वर पाय करून तिचे डोके भिंतीवर आपटून निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादायक प्रकार आंबेगाव बुद्रुक येथील श्रीकृष्ण अपार्टमेंट येथे घडला आहे. जितेंद्र उत्तम पाटील (33, आंबेगाव बुद्रुक) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, मुस्कान (03) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत 24 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधातून ही मुलगी जन्मलेली असल्याचे कळताच याच रागातून पतीने मुलीची हत्या केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (In Pune a three-year-old girl was murdered by beatened by her father)

जितेंद्र हा चालक म्हणून काम करतो. तो मूळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. तर, पत्नी गृहिणी असून, ती गोदिंया जिल्ह्यातील आहे. त्यांचा जानेवारी 2022 मध्ये विवाह झाला होता. तत्पूर्वी जितेंद्र याची पत्नी हिचा पहिला विवाह झालेला आहे. तिला तीन वर्षांची मुस्कान ही मुलगी असल्याचे पती जितेंद्रला सांगितले होते. काही महिन्यांपूर्वी तिचा पहिल्या पतीबरोबर घटस्फोट झाल्याचेही तिने जितेंद्र याला विवाहापूर्वी सांगितले होते. तरीही जितेंद्र यांनी हे सर्व मान्य करत विवाह केला होता.

अनैतिक संबंधातून जन्मल्याच्या संशयातून हत्या

जितेंद्र व त्याची फिर्यादी पत्नी विवाहानंतर आंबेगाव बुद्रुक परिसरातील दुग्गड शाळेच्या पाठिमागे एका सोसायटीत भाड्याच्या खोलीत राहत होते. जितेंद्र याला पत्नीचा पहिला विवाह झालेलाच नसून, ही मुलगी अनैतिक संबंधातून जन्मलेली असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यावरून त्याला संशय आल्याने त्यांच्यात गुरूवारी रात्री वाद झाले. या वादातून त्याने मुस्कान हिचे पाय धरून तिला उलटे करत तिचे डोके भिंतीवर आपटले. मुस्कान बेशुद्ध झाल्याने तिला दोघांनी तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. याच दरम्यान तिचा मृत्यू झाला. मुस्कानचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रुग्णालयाने भारती विद्यापीठ पोलिसांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. गुन्हा दाखल करत जितेंद्र याला अटक केली. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर करत आहेत. (In Pune a three-year-old girl was murdered by beatened by her father)

इतर बातम्या

Chandrapur Fire : चंद्रपूरमधील सिंदेवाही येथे वन विभागाच्या लाकूड डेपोला आग, लाखोंचे नुकसान

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंनी आपल्या 12 वर्षाच्या मुलीच्या हाती दिलं गाडीचं स्टेअरिंग! आता गुन्हा दाखल करण्याची मागणी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.