नवाब मलिकांचा थेट आरोप, आता अमृता फडणवीस म्हणतात, तेव्हा पंटरचा रेकॉर्ड नव्हता !

जयदीप राणाचं नाव गाण्यातून वगळण्यात आलं, याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना माहीत नसेल तो ड्रग्जमध्ये आहे म्हणून. रिव्हर मार्चलाही माहीत नसेल. म्हणून त्याचं नाव कट केलं असेल. तीन चार वर्षांनी सेंट्रल एजन्सीने त्याला पकडलं. त्यांना वाटलं हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे तर त्यांनी नाव काढलं तर काय चुकीचं आहे?, असा सवालही त्यांनी केला.

नवाब मलिकांचा थेट आरोप, आता अमृता फडणवीस म्हणतात, तेव्हा पंटरचा रेकॉर्ड नव्हता !

मुंबईः या ग्रुपला मी देवेंद्र फडणवीसांकडे घेऊन आले. ईशा फाऊंडेशनने त्यांना घेतलं म्हणून आम्ही घेतलं. तेव्हा जयदीप राणाचा पंटरचा काही रेकॉर्ड नव्हता, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नवाब मलिकांवर पलटवार केलाय. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी अमृता फडणवीसांना लक्ष्य केलं होतं. त्यालाच आता अमृता फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलंय.

राणाचं नाव काढलं तर चुकीचं काय?

अमृता फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जयदीप राणाचं नाव गाण्यातून वगळण्यात आलं, याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना माहीत नसेल तो ड्रग्जमध्ये आहे म्हणून. रिव्हर मार्चलाही माहीत नसेल. म्हणून त्याचं नाव कट केलं असेल. तीन चार वर्षांनी सेंट्रल एजन्सीने त्याला पकडलं. त्यांना वाटलं हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे तर त्यांनी नाव काढलं तर काय चुकीचं आहे?, असा सवालही त्यांनी केला. मलिक यांनी जाणीवपूर्वक आरोप केले. आमच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते काय एक्सपोज करणार? आमच्याकडे जमीनी नाही, साखर कारखाने नाही, त्यामुळे ते आरोप करणारच. पण आम्ही कुणाला घाबरत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मनात आलं असतं तर शाहरुख आणि सलमानलाही घेतलं असतं

या गाण्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी झाले. मीही झाले. देवेंद्र फडणवीसही झाले. त्यानंतर रिव्हर मार्चनेही आमच्यासाठी एक गाणं बनवा, असं त्यांना सांगितलं. सचिन गुप्तांनी त्याला होकार दिला. त्यानंतर सचिन गुप्ताने दिग्दर्शनासाठी मदत केली. तर रिव्हर मार्चने गाणं तयार केलं. फुकटात गाणं तयार केलं. त्या गाण्यात कोळी समाज आणि डब्बेवाले आले. ते एक पैसा न घेता आले. मनात आलं असतं तर शाहरुख आणि सलमानलाही घेतलं असतं, असंही अमृता फडणवीस म्हणाल्यात.

बिगडे नवाबला हे सवाल तुम्हाला विचारावे लागतील

आम्ही जागृती केली आणि आज आम्हालाच लाथ मारली जाते. आम्हाला कोणतीही राजकीय अभिलाषा नाही. त्यांच्या मागे हात धुवून लागलात हे कोणतं राजकारण आहे. तुम्हाला राजकारण करायचं आणि बिगडे नवाब व्हायचं आहे तर तुम्ही बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा. तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. बिगडे नवाबला हे सवाल तुम्हाला विचारावे लागतील . त्यांच्या बॉसला किंवा त्यांच्या सूपर बॉसला, असं म्हणत अमृता फडणवीसांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांवर नाव न घेता हल्लाबोल केलाय.

संबंधित बातम्या:

जयदीप राणा आणि नीरज गुंडे नेमके कोण जे नवाब मलिकांच्या निशाण्यावर आहेत, फडणवीसांशी संबंध काय ?

Sangli | कुलूप घालून आंदोलन केल्याप्रकरणी आमदार गोपिचंद पडळकरसह 71 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI