AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, मुख्यमंत्री निर्णय घेणार

चंद्रपूरमधील दारुबंदी उठवणे, तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या नुकसानग्रस्तांना मदत देणे, त्याचबरोबर राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याबाबत महत्वाची चर्चा झाली.

राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, मुख्यमंत्री निर्णय घेणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: May 27, 2021 | 5:55 PM
Share

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात चंद्रपूरमधील दारुबंदी उठवणे, तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या नुकसानग्रस्तांना मदत देणे, त्याचबरोबर राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याबाबत महत्वाची चर्चा झाली. त्यात अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर तौत्के चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. इतकंच नाही तर राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचाही निर्णय झाल्याची माहिती देण्यात आलीय. (Discussion at Cabinet meeting on relaxation in lockdown)

राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता येणार

राज्यात जवळपास महिनाभर कडक लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी राज्यातील लॉकडाऊन पूर्णपणे उठवला जाणार नाही. पण वेळोवेळी परिस्थिती पाहून लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. ’21 जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे, अशाठिकाणी बेड उपलब्धता हा प्रश्न असतो. त्यामुळे एक नक्की आहे की सरसकट लॉकडाऊन उठवणार असा विषय नाही. लॉकडाऊन जो आज आहे. तो कायम ठेवून त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. त्यामध्ये मग वेळेची मर्यादा किंवा अन्य बारकाव्यांवर स्वतंत्र चर्चा केली जाईल. त्यानंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल’, अशी माहिती टोपे यांनी दिलीय.

लसीकरणाच्या राष्ट्रीय धोरणाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करणार

ग्लोबल टेंडरमध्ये फायझर, स्पुतनिक, एस्ट्राझेनेका, जॉन्सन एन्ड जॉन्सन्स या कंपन्यांकडून प्रतिसाद आला आहे. काही कंपन्यांनी रेट दिलाय. पण काहींनी त्याबाबत सविस्तर माहिती दिली नाही. दरम्यान, केंद्राकडून सध्या कोविशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुटनिक या लसींनाच परवानगी देण्यात आलेली आहे. आता फायझर, मॉडर्ना किंवा अन्य लसींना परवानगी मिळणार का? हा केंद्राचा विषय आहे. त्यामुळे लशींच्या आयातीबाबत राष्ट्रीय पातळीवर एक धोरण निश्चित करण्यासाठी आपण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना विनंती करणार असल्याचं टोपे म्हणाले.

चंद्रपुरातील दारुबंदी उठवली

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. दारुबंदीनंतर चंद्रपू जिल्ह्यात अवैध दारु विकली जात होती. दारुबंदी उठवण्याबाबत अडीच हजार निवेदनं आली. अवैध आणि बनावट दारु जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळे दारुबंदीचे दुष्परिणाम पाहायला मिळत होते. याबाबत एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीनं दारुबंदी उठवण्यात यावी असा अहवाल दिला होता. तो अहवाल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आला. त्यानंतर एकमताने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवली, ठाकरे सरकाराचा मोठा निर्णय

Discussion at Cabinet meeting on relaxation in lockdown

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.