AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लगेचच सर्व काही उघडणार नाही, लॉकडाऊनच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं रोखठोक उत्तर

कोरोनाचं संकट पाहता महाराष्ट्रात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र लवकर काही उघडणार नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

लगेचच सर्व काही उघडणार नाही, लॉकडाऊनच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं रोखठोक उत्तर
aaditya-Aditya
| Updated on: May 27, 2021 | 1:34 PM
Share

मुंबई : कोरोनाचं संकट पाहता महाराष्ट्रात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन (Maharashtra lockdown update) आहे. आता हा लॉकडाऊन 1 जूनपासून शिथील करणार की वाढवणार याबाबत व्यापाऱ्यांना उत्सुकता आहे. मात्र लगेचच सर्व काही उघडणार नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन आपल्याला हळूहळू उघडावे लागेल. कोरोना स्थिती पाहून निर्णय होईल. लसीचा जसा पुरवठा होतो तसं लसीकरण आपण करतोय. चिंतेत राहू नका , गर्दी करू नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. मागच्यावेळी लॉकडाऊन हटवल्यानंतर आकडे अचानक वाढले. आता आकडे जरी कमी असले तरी लगेचच सर्व काही सुरु होणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आकडे कसे घटतील याकडे लक्ष

मुंबईतले आकडे आटोक्यात आले आहेत असं वाटत असलं तरी आम्ही ते पूर्ण कसे घटतील याकडे लक्ष देतोय. अजूनही 1300 ते 1400 केसेस आहेत त्यामुळे त्या केसेस पूर्ण कमी करण्याकडे आमचं लक्ष आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

लॉकडाऊनबद्दल आताच काही सांगू शकत नाही. लोकांचे जीव वाचवणं आमच्यासाठी महत्वाचं आहे. मागच्या वेळी लॉकडाऊन थोडा उगडला तेव्हा 11 हजार च्या आसपास केसेस गेल्या होत्या. त्यामुळे यावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. लॉकडाऊनबद्दल आताच काही सांगू शकत नाही पण लगेचच सगळं काही उघडणार नाही हे निश्चित आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

लसीकरणाचा मेगा प्लॅन

लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय आहे. प्रत्येक राज्याची मागणी आहे की आम्हाला जास्तीत जास्त लस द्या, तशी आमचीही आहे पण जसजशी लस उपलब्ध होतेय तसं लसीकरण केलं जातंय. महाराष्ट्राने आतापर्यंत सगळ्यात जास्त लसी दिलेल्या आहेत. काही गावं तर अशी आहेत की पूर्णपणे लसीकरण झालेलं आहे. संभाजीनगर परिसरात अशी दोन गावे आहेत.

मुंबईत 227 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु आहे. ड्राईव्ह इन लसीकरण सेंटर सुद्धा सुरू आहेत. जेवढ्या लसी लवकर येतील तेवढं लसीकरण होईल. ग्लोबल टेंडरबाबत महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातल्या लसी बाहेर गेल्या नसत्या तर लसीकरण जास्त झालं असतं या जर तरच्या गोष्टी आहेत. मुंबई उपनगरचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर मुंबईत जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याची जबाबदारी आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आपण 7 दिवसात मुंबईतील संपूर्ण लसीकरण करु. भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत असतं त्यांना ते करू द्या, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन

महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं 13 मे रोजी घेतला होता. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं होता. आता ब्रेक द चैनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असेल. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकोरमायकोसिस वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. यानंतर आता हे निर्बंध येत्या 1 जूनपर्यंत लागू राहणार आहेत.

14 जिल्हे रेड झोनमध्ये 

दरम्यान, महाराष्ट्रातील 14 जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये आहेत अशी माहिती दोन दिवसापूर्वी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली होती.  लोकल बंद असल्यामुळे मुंबईत कोरोनाचे (Mumbai corona) रुग्ण कमी झाले आहेत. मुंबई लोकलवर (Mumbai Local) काही दिवस निर्बंध लावावाच लागेल. 15 दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागणार आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील 14 जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा, असंही विजय वडेट्टीवारांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या 

Maharashtra Lockdown: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन? 

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं?; मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ कानमंत्र

Maharashtra lockdown Extended | राज्यात कोरोनाचा विळखा, कडक निर्बंध 1 जूनपर्यंत लागू राहणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.