Maharashtra lockdown Extended | राज्यात कोरोनाचा विळखा, कडक निर्बंध 1 जूनपर्यंत लागू राहणार

Break the chain rules | राज्यातील कडक निर्बंध येत्या 1 जून पर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नुकतंच याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. (Maharashtra lockdown extend)

Maharashtra lockdown Extended | राज्यात कोरोनाचा विळखा, कडक निर्बंध 1 जूनपर्यंत लागू राहणार
महाराष्ट्र लॉकडाऊन
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 12:11 PM

मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. आता ब्रेक द चैनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असेल. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकोरमायकोसिस वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. (Maharashtra lockdown news Government decided to extend break the chain rules imposed till 1 June)

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. यानंतर आता हे निर्बंध येत्या 1 जूनपर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे परिपत्रक शासनाने जाहीर केले आहे.

या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे. हा अहवाल प्रवेश करण्यापूर्वी 48 तासांमधील असणं आवश्यक आहे. दूध संकलन आणि वाहतुकीवर निर्बंध नसतील. तसेच दुधाच्या रिटेल विक्रीला स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांच्या मर्यादेत सूट असेल, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

ब्रेक द चैन नवी नियमावली

1) परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 48 तास आधीचा RTPCR रिपोर्ट बंधनकारक

2) महाराष्ट्रातून घोषित केलेल्या संवेदनशील राज्यातून येणाऱ्या RTPCR रिपोर्ट बंधनकारक असणार

3) परराज्यातून मालवाहूतक करणा-यांना RTPCR रिपोर्ट निगेटीव्ह असावा तो 7 दिवस ग्राह्य धरणार

4) मालवाहतूक ट्रकमध्ये केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाचं प्रवेश

5) बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थनानिक आपत्ती व्यवस्थापनाने तो बंद करण्याचा निर्णय घ्यावा

6) दूधाचे कलेक्शन, वाहतूक आणि प्रकिया यांना परवानगी असणार

7) एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल मेट्रो आणि मेट्रो मध्ये प्रवाशांची परवानगी

राज्यातील कोरोना आकडेवारी

  • राज्यात गेल्या 24 तासांत 46781 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली
  • गेल्या 24 तासांत 58805 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत
  • एकूण 4600196 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत
  • राज्यात एकूण 546129 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.01% झाले आहे

देशात बाधित रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी 

तारीख –       बाधित रुग्ण          – मृत्यू 

12 मे : 3 लाख 48 हजार 421 – 4205 11 मे : 3लाख 29 हजार 942 – 3876 10 मे : 3लाख 66 हजार 161 – 3754 9 मे : 4 लाख 03 हजार 738 – 4092 8 मे : 4 लाख 01 हजार 078 – 4187 7 मे : 4 लाख 14 हजार188 – 3915 6 मे : 4 लाख 12 हजार 262 – 3980

संबंधित बातम्या :

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

Kolhapur corona death rate : कोल्हापूरचा मृत्यूदर देशात सर्वाधिक, 3 कारणं समोर

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.