AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंचे शिलेदार नाराज, भूकंप अटळ? सर्वात मोठी बातमी समोर

मोठी बातमी समोर येत आहे, शिलेदारांच्या नाराजीचा फटका उद्धव ठाकरे यांना बसू शकतो. महापालिका निवडणुकीपूर्वी मोठ्या भूकंपाची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंचे शिलेदार नाराज, भूकंप अटळ? सर्वात मोठी बातमी समोर
| Updated on: Jan 20, 2025 | 5:36 PM
Share

जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जळगावात ठाकरे गटातील नाराजांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू असून, जळगाव महापालिकेचे ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे चार ते पाच माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 1 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.  विधानसभा निवडणूक लढलेले तसेच ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शासकीय दौऱ्यासोबत शिवसेना पक्षाचा संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटावर नाराज असलेले माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगावमध्ये महापालिका निवडणुकीच्या आधीच ठाकरे गटाच्या महापालिकेतील नगरसेवकांना सोबत घेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आमच्यावर लागलेला गद्दारीचा डाग जनतेने पुसून टाकला असून,  इथे फक्त आता शिवसेना चालणार आहे, असंही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका तसेच पंचायत समितीवर भगवाच फडकणार असल्याचा विश्वास देखील यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान दुसरीकडे नांदेडमध्ये देखील उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ  पवार यांनी राजीनामा दिला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा – कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटचे उमेदवार देखील होते. हा नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता जळगावमध्ये देखील धक्का बसणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड