AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राचे दोन मंत्रीच एकमेकांच्या विरोधात ठाकले, नेमकं प्रकरण काय?

मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "भडक वक्तव्य करण्याची भुजबळांची जुनीच सवय आहे. मी फार मोठा कोणी आहे हे दाखवण्याचा भुजबळांचा प्रयत्न असतो", असं प्रत्युत्तर शंभूराज यांनी दिलंय.

महाराष्ट्राचे दोन मंत्रीच एकमेकांच्या विरोधात ठाकले, नेमकं प्रकरण काय?
| Updated on: Nov 07, 2023 | 11:05 PM
Share

मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी नोंदी देण्यास विरोध केलाय. भुजबळ यांनी आपल्या सरकारच्या विरोधातच भूमिका मांडली आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी सरकारने जी कृती केली त्या कृतीवर छगन भुजबळ यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलंय. कुणबी नोंदींवरुन मराठ्यांना दिल्या जाणाऱ्या कुणबींच्या जातप्रमाणपत्रावरुन मंत्री भुजबळच सरकारवर तुटून पडले आहेत. यावरुन अजित दादांच्या गटाचे बडे मंत्री भुजबळ यांना आता शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय. भुजबळांना भडक बोलण्याची सवय आहे, जे होणार नाही ते होणार असल्याचं सांगून आपण फार मोठे आहोत हे दाखवण्याचा भुजबळांचा प्रयत्न असतो, अशी टीका मंत्री देसाई यांनी केली आहे.

जरांगे पाटलांच्या उपोषण स्थळी सरकारनं निवृत्त न्यायमूर्तींना पाठवलं होतं. त्यावरुनही भुजबळांनी टीका केली होती. त्या टीकेलाही मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय. तर मंत्री भुजबळांची प्रतिक्रिया स्वाभाविक असून, सरकारचा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

मनोज जरांगे यांचं मराठा नेत्यांना आवाहन

सरकारमध्येच मंत्री विरुद्ध मंत्री असा सामना सुरु झाला असताना, भुजबळ ओबीसींचं नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांचीही काही मतं आहेत, असं म्हणत दादांच्याच गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. तर ज्या पद्धतीनं ओबीसी नेते म्हणून भुजबळ उघडपणे समोर येऊन बोलत आहेत. त्याप्रमाणे मराठा नेत्यांनीही पुढं यावं, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय.

एकंदरितच, ज्यांच्या नोंदी सापडतील त्या मराठ्यांना कुणबीचं दाखले देणं सुरुच राहणार आहे. त्या नोंदींच्या संख्येवरुन भुजबळांनी सवाल केले असले तरी सरकार मागे हटण्यास तयार नाही. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपल्याच सरकारच्या विरोधात मंत्री भुजबळ उभे ठाकलेत, हे स्पष्ट दिसंतय.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.