AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane News: अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईला नागरिकांचा विरोध, दिव्यात रस्त्यावर उतरत निदर्शने

ठाणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली जात आहे. दिव्यातील खान कंपाउंड परिसरात कारवाई सुरु असताना नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

Thane News: अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईला नागरिकांचा विरोध,  दिव्यात रस्त्यावर उतरत निदर्शने
Diva Protest
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Edited By: | Updated on: Jun 23, 2025 | 3:35 PM
Share

ठाणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईला नागरिकांचा विरोध होताना दिसत आहे. दिव्यातील खान कंपाउंड परिसरात कारवाई सुरु असताना नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. पालिकेची कारवाई थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दिव्यात ठाणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम हटवण्याचे काम सुरु आहे. याआधी ठाणे महापालिकेने संबंधित मालकांना नोटीशीही दिल्या होत्या, त्यानंतर आता पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. 13 इमारतींवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. सध्या खान कंपाउंड परिसरात मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत.

दिव्यातील अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत कोर्टानेही आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिव्यासह ठाणे शहर आणि इतरही ठिकाणी अनधिकृत बांधकाम हटविण्याचे काम सध्या सुरु आहे. या कारवाईसाठी मोठा फौजफाटाही तैणात करण्यात आला आहे. मात्र तरीही दिव्यात शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरत ही कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे.

यावेळी बोलताना आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले की, ‘आम्ही बऱ्याच दिवसांपासून येथे राहत आहोत. आम्हाला तोडफोडीबाबत कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. पालिकेकडून थेट कारवाईला सुरुवात झाली. आमची इरातर पूर्णपणे तयार झालेली आहे. आम्हाला वीज कनेक्शनही देण्यात आले आहे. इमारत अनधिकृत आहे म्हटल्यावर आम्हाला वीज कनेक्शनही द्यायला नको होते असंही विधान आंदोलक महिलांनी केलं आहे.

Follow Us
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?