AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिलीपासून मूल, दुसरीसोबत लग्न आणि तिसरीला… एका शिक्षकाच्या तीन बायका, काळं कृत्य वाचून तुम्हीही हादराल

डोंबिवलीत एका शिक्षकाने १४ वर्षांत तीन महिलांना प्रेमाच्या नावाखाली फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल तिवारी नावाच्या या शिक्षकाने लिव्ह-इन रिलेशनशिप, लग्न आणि नंतर फसवणूक असा प्रकार केला.

पहिलीपासून मूल, दुसरीसोबत लग्न आणि तिसरीला... एका शिक्षकाच्या तीन बायका, काळं कृत्य वाचून तुम्हीही हादराल
| Updated on: Sep 17, 2025 | 8:15 AM
Share

एका शिक्षकाने प्रेमाच्या नावाखाली एकामागोमाग एक अशा तीन महिलांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे. प्रेमसंबंध, लिव्ह-इन, मूल आणि त्यानंतर धोका अशा एका वेगळ्याच ‘लव्ह ट्रॅक’वर हा शिक्षक अनेक वर्षांपासून प्रवास करत होता. राहुल तिवारी असे या आरोपी शिक्षकाचे नाव असून तो उल्हासनगरमधील एका प्रतिष्ठित शाळेत कार्यरत होता. पण पडद्यामागे त्याचे प्रेम आणि फसवणुकीचे वेगळेच धंदे सुरू होते. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

राहुल तिवारी याचे एका पीडित शिक्षिकेशी गेल्या १४ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या संबंधातून त्यांना एक मुलगाही झाला. मात्र, मुलाचा जन्म झाल्यानंतर राहुलने तिला सोडून दिले. पहिल्या महिलेला सोडून दिल्यावर राहुलने दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्न केले. परंतु, हे लग्न फार काळ टिकले नाही. मात्र, लग्नानंतर त्याने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. ज्यामुळे ती त्याला सोडून माहेरी परतली. दुसऱ्या पत्नीने त्याला सोडल्यावर राहुलने पुन्हा तिसऱ्या एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचीही फसवणूक केली.

यानंतर एका पीडित शिक्षिकेने याबद्दल पोलिसात तक्रार केली. या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी राहुल तिवारीला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. राहुल तिवारीने २०११ पासून महिलांना फसविण्याचा सिलसिला सुरू केला होता आणि त्याचा हा धंदा गेली १४ वर्षे सुरू होता. त्याने आणखी किती महिलांना अशा प्रकारे फसवले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

डोंबिवलीत खळबळ

शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे डोंबिवलीसह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाकडून अशा प्रकारचे गैरकृत्य घडल्यामुळे समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या व्यक्तीकडून असे कृत्य होणे अत्यंत निंदनीय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न समाजाला पडला आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर या प्रकरणातील आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.