डोंबिवली हादरली! 4 वर्षीय चिमुकलीवर 85 वर्षीय शेजाऱ्याकडून अत्याचार, परिसरात संतापाची लाट

डोंबिवलीमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. डोंबिवलीत 4 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

डोंबिवली हादरली! 4 वर्षीय चिमुकलीवर 85 वर्षीय शेजाऱ्याकडून अत्याचार, परिसरात संतापाची लाट
dombivili news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 9:25 PM

डोंबिवलीतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीत एका 4 वर्षीय चिमुकलीवर लैगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकलीच्या घराशेजारी राहणाऱ्या 85 वर्षीय नराधमाने हादरवणारं कृत्य केलं आहे. चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उघडीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याचा तपास करून त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षीय चिमुकली घरासमोर खेळत होती. त्यावेळी नराधमाने चिमुकलीला घरात बोलावून घेतले. त्यानंतर त्याने चिमुकलीसोबत अयोग्य प्रकार केल्याची माहिती आहे. पीडित मुलीच्या आईला हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर तिने मुलीची सुटका केली. त्यानंतर पोलिसांत जाऊन तक्रार देखील केली. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी 85 वर्षीय म्हाताऱ्याच्या विरोधात पोक्सोसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आता पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं?

चार वर्षीय चिमुकलीची आई घरात होती. तिची आईचं घरात काम सुरू होतं. तर तिची चार वर्षीय मुलगी घराबाहेर खेळायला गेली. मुलगी घरासमोर खेळत होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या म्हाताऱ्याची नजर चिमुकलीवर पडली. या म्हाताऱ्याने तिला घरात बोलावून घेतले. घरात बोलावल्यानंतर त्याने मुलीशी अयोग्य प्रकार केले. थोड्यावेळाने पीडित मुलीची आई घराबाहेर आली. घराबाहेर आल्यानंतर मुलीची शोधाशोध करण्यास सुरुवात केली. त्यावेळी महिलेला तिची मुलगी शेजाऱ्याच्या घरात आढळली. त्यानंतर मुलीसोबत अयोग्य प्रकार केल्याचे आईच्या निदर्शनास आले. आईने तातडीने मुलीची सुटका केली. तर डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 75 (2) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी 85 वर्षीय आरोपीला अटक केली. पोलिसांनी चिमुकलीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us