42 डिग्री तापमान, स्कुटीवरुन 180 किमीचा भर उन्हात प्रवास, डॉ. प्रज्ञा घरडेंनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेला सलाम

Yuvraj Jadhav

|

Updated on: Apr 27, 2021 | 2:55 PM

प्रज्ञा घरडे या डॉक्टर महिलेच्या कर्तृत्वाचा सोशल मीडियावर सुद्धा मोठं कौतूक होत आहे. Dr.Pradnya Gharade Balaghat to Nagpur

42 डिग्री तापमान, स्कुटीवरुन 180 किमीचा भर उन्हात प्रवास, डॉ. प्रज्ञा घरडेंनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेला सलाम
डॉ.प्रज्ञा घरडे
Follow us

नागपूर: सध्या राज्यासह नागपूरमध्ये कोरोनाचा कहर असून उपचारासाठी मेडिकल स्टाफ सुद्धा कमी पडतोय. आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. रुग्णांना डॉक्टर म्हणून आपली असलेली गरज लक्षात घेऊन सुट्टीवर गेलेल्या नागपुरातील एक डॉक्टर महिलेच्या कर्तव्यदक्षतेची चर्चा होत आहे. महिला डॉक्टर मध्य प्रदेश मधील बालाघाटपासून नागपूरपर्यंत 180 किमीचा प्रवास भर उन्हात स्कुटीवरुन करत कामावर हजर झाली.  प्रज्ञा घरडे या डॉक्टर महिलेच्या कर्तृत्वाचा सोशल मीडियावर सुद्धा मोठं कौतुक होत आहे. (Dr Pradnya Gharade join duty with driving 180 km travel Balaghat to Nagpur  on scotty for starting medical practice in covid time)

प्रज्ञा घरडेंची कर्तव्यदक्षता

कोरोनाच्या या महामारीत डॉक्टर शिवाय दुसरा देव नाही आणि त्याची नितांत गरज आहे हे खरं आहे. आजही डॉक्टर आपल्या कर्तव्यप्रती दक्ष असलेल्या प्रज्ञा घरडे या डॉक्टरने दाखवून दिलं, नवा आदर्श घालून दिला आहे. प्रज्ञा नागपूर मध्ये आपली वैद्यकीय सेवा देत होत्या. मधातल्या काळात सुट्टीवर आपल्या गावी बालाघाट मध्ये गेल्यानंतर रुग्णालयात डॉक्टरांची कमी जाणवत असताना रुग्णालयाने डॉ. प्रज्ञा याना लवकर परत येण्यासाठी कॉल केले. त्याला डॉ. प्रज्ञा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन प्रवासाचा प्रश्न

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागला होता. मध्यप्रदेश मध्ये जाणारी वाहतूक देखील बंद होती. त्यामुळे नागपूरमध्ये जायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला होता. प्रज्ञा यांनी थेट आपल्या बाईकने नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात देखील आणला. 42 डिग्री तापमन,सुनसान रस्ते, प्रवासात कुठलाही सहारा नसताना देखील आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रज्ञाने नागपूर गाठत आपली रुग्ण सेवा पुन्हा एकदा सुरू केली.

रुग्णालयाने बोलावतात क्षणाचाही विलंब त्यांनी केला नाही.आपली गरज रुग्णांना आहे, आपल्या डॉक्टरकीचा फायदा झाला पाहिजे, लोकांचे जीव वाचले पाहिजे हा उद्देश ठेऊन प्रवासाला सुरुवात केल्याचं डॉ. प्रज्ञा घरडे यांनी सांगितलं. नागपूरच्या एका खाजगी कोविड सेंटर मध्ये आपली सेवा प्रज्ञा देत आहेत. त्यामुळे जिद्द असेल आणि आपल्या कर्तव्यप्रती प्रामाणिकता असेल तर कुठलीही अडचण रोखू शकत नसल्याचं प्रज्ञा यांनी दाखवून दिलं आहे.

संबंधित बातम्या: 

वडिलांच्या वर्षश्राद्धाचा खर्च टाळला, नागपूरच्या तरुणाकडून कोरोनाग्रस्तांना ‘ॲाक्सिजन ह्युमिडीफायर’ यंत्र भेट

महाराष्ट्रासाठी गुडन्यूज, ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ नागपुरात दाखल, उद्या नाशिकला पोहोचणार

(Dr. Pradnya Gharade join duty with driving 180 km travel Balaghat to Nagpur  on scotty for starting medical practice in covid time)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI