AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रासाठी गुडन्यूज, ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ नागपुरात दाखल, उद्या नाशिकला पोहोचणार

पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. (first Oxygen Express reached in maharashtra)

महाराष्ट्रासाठी गुडन्यूज, 'ऑक्सिजन एक्सप्रेस' नागपुरात दाखल, उद्या नाशिकला पोहोचणार
| Updated on: Apr 23, 2021 | 11:06 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो आहे. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस (Oxygen Express) महाराष्ट्रात दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. (first Oxygen Express reached in maharashtra Nagpur from visakhapatnam)

विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या 7 (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्सप्रेस आज सायंकाळी, 8.10 वाजता महाराष्ट्रातील नागपूर स्थानकात दाखल झाली. नागपूर स्थानकात 3 टँकर उतरविण्यात येणार असून उर्वरित टँकर नाशिक रोड स्थानकात उतरविण्यात येणार आहेत. ऑक्सिजन एक्सप्रेस उद्या सकाळी नाशिक रोड स्थानकात पोहोचेल.

गेल्या वर्षीही लॉकडाऊनमध्ये रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली. यंदादेखील रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली आहे. दरम्यान, ऑक्सिजन एक्सप्रेस राज्यात दाखल झाल्यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे.

5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन उपलब्ध होणार

या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या 5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असं केंद्र शासनाला सुचवलं होतं. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली. यापुढील काळात ऑक्सिजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर केंद्राची मदत

राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर रेल्वेकडून खास ऑक्सिजन एक्सप्रेस देण्यात आली आहे. महाराष्ट्राला विशाखापट्टणम, जमशेदपूर, राऊरकेला आणि बोकारो इथून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

संबंधित बातम्या

शरद पवार ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी मैदानात, साखर कारखान्यांना निर्मिती करण्याचे आदेश

ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पालिका सरसावली; चार सूत्री अ‍ॅक्शन प्लान तयार

(first Oxygen Express reached in maharashtra Nagpur from visakhapatnam)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.