AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लाल परी’मध्ये जीव गुंतला! एसटीच्या सेवेतून निवृत्त होणारे चालक माणिकदादा ढसाढसा रडले

एसटीमध्ये त्यांचा एवढा जीव गुंतला की कुणा जवळच्या व्यक्तीपासूनच आपण दूर चाललोय या भावनेने त्यांना अस्वस्थ करून सोडले आणि रोजच्या ‘एचएच 14 बीटी 912’ या क्रमांकाच्या एसटीतून काढता पाय घेण्याआधी त्यांना स्वत:ला सावरता आले नाही. (Driver Manikdada, who is retiring from ST service, became emotional)

‘लाल परी’मध्ये जीव गुंतला! एसटीच्या सेवेतून निवृत्त होणारे चालक माणिकदादा ढसाढसा रडले
‘लाल परी’मध्ये जीव गुंतला! एसटीच्या सेवेतून निवृत्त होणारे चालक माणिकदादा ढसाढसा रडले
| Updated on: Jun 02, 2021 | 6:42 PM
Share

सांगली : कामाच्या ठिकाणी टंगळमंगळ करणारे बरेच सापडतील, पण कामावर जीवापाड प्रेम करणारे विरळच. अशाच दुर्मिळ लोकांपैकी एक म्हणावे लागतील ते सांगली जिल्ह्यातील माणिकदादा यादव. एसटीच्या इस्लामपूर आगारामध्ये 35-36 वर्षे ड्रायव्हर म्हणून प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर सोमवारी माणिकदादांच्या सेवानिवृत्तीचा दिवस उजाडला. एवढी वर्षे एसटीच्या माध्यमातून लाखो प्रवाशांच्या मनावर अधिराज्य केलेले माणिकदादा आपल्या लाडक्या लाल परीला निरोप देताना प्रचंड गहिवरून गेले. एसटीमध्ये त्यांचा एवढा जीव गुंतला की कुणा जवळच्या व्यक्तीपासूनच आपण दूर चाललोय या भावनेने त्यांना अस्वस्थ करून सोडले आणि रोजच्या ‘एचएच 14 बीटी 912’ या क्रमांकाच्या एसटीतून काढता पाय घेण्याआधी त्यांना स्वत:ला सावरता आले नाही. एसटीतील बाप्पासमोर हात जोडत ते ढसाढसा रडू लागले. कामाप्रती असलेली त्यांची ही निष्ठा इस्लामपूर आगारातील सर्वच कर्मचाऱ्यांना तसेच प्रवाशांनाही चकीत करणारी होती. (Driver Manikdada, who is retiring from ST service, became emotional)

35-36 वर्षे एसटी चालक म्हणून प्रामाणिक सेवा

माणिकदादा यादव यांनी एसटीमध्ये चालक म्हणून 35 ते 36 वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. ग्रामीण भागातील रस्ते कितीही खड्ड्यांचे असो वा कुठल्याही दुर्गम भागात गाडी न्यायचे असो, माणिकदादांनी कधीच कुरकुर केली नाही. त्यांनी सेवा देताना वक्तशीरपणा अधिक काटेकोरपणे जपला. ते प्रचंड वक्तशीर असल्याचे रोजच्या प्रवाशांना चांगलेच ठाऊक झाले होते. त्यामुळेच वारणाकाठच्या येलूर, ऐतवडे खुर्द, कुंडलवाडी, तांदुळवाडी, कोरेगाव, नागाव, ढवळी आणि बागणी गावांतून सांगलीसाठी वर्षानुवर्षे धावणाऱ्या येलूर-सांगली (एमएच 14 बीटी 912) या सकाळच्या गाडीचे माणिकदादा आणि प्रवासी हे घट्ट नाते जोडले गेले. त्यामुळे माणिकदादांच्या सेवानिवृत्तीचे वृत्त कळताच रोजचे प्रवासीही गहिवरले.

माणिकदादांचे व्रत, आपल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप नको!

एसटीच्या चालकांना तासन्तास स्टेयरिंगवर हात ठेवावा लागतो. त्यामुळे चालक बरेच त्रस्त झालेले असतात. अशावेळी कामाच्या ताणातून प्रवाशांवर चिडण्याचेही प्रसंग अनेकदा घडतात. मात्र माणिकदादांच्या बाबतीत असे प्रकार घडलेच नाही. त्यांनी आपल्या जीवनातील सुख-दु:खाच्या एसटीच्या सेवेवर परिणाम होऊ दिला नाही. आपल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास नको हे व्रत त्यांनी 35-36 वर्षांच्या सेवेदरम्यान जपले. त्यांनी अखंडित सेवा बजावली. त्यांनी दांडी मारल्यामुळे गाडी रद्द झाली, असा प्रकार कधीच घडला नाही. मात्र वयोमानामुळे अर्थात सेवानिवृत्तीमुळे त्यांच्या सेवेला ब्रेक लागला. कोरोनामुळे सव्वा वर्षे गाडी एकाच जागी थांबून आहे, पण आज ना उद्या जेव्हा ती धावू लागेल, तेव्हा स्टेअरिंगर माणिकदादा नसतील. ही नुसती कल्पना करूनही प्रवासी गहिवरले आहेत.

एसटीला मारली घट्ट मिठी

एसटीच्या सेवेतून निवृत्त होणे माणिकदादांच्या मनाला रुचलेले नाही. पण निवृत्तीपुढे त्यांच्या हाती दुसरा पर्याय उरलेला नाही. निवृत्ती स्वीकारताना त्यांनी इस्लामपूर आगार गाठला आणि तेथे उभ्या असलेल्या 912 क्रमांकाच्या आपल्या रोजच्या एसटीला त्यांनी घट्ट मिठी मारली. त्यांनी त्या एसटीचा डिझेलमिश्रित गंध तनामनात भरून घेतला. त्यांच्या निवृत्तीमुळे यापुढे आगाराच्या प्रवेशद्वारावरच विशिष्ट लयीत ऐकू येणारा हॉर्न यापुढे वाजणार नाही. त्यांच्यासारख्या निष्ठावान कर्मचाऱ्यांमुळेच आजही एसटी लाखो प्रवाशांच्या मनावर अधिराज्य करीत आहे. (Driver Manikdada, who is retiring from ST service, became emotional)

इतर बातम्या

ठाकरे मंत्रिमंडळाचे तीन मोठे निर्णय, कोरोनात अनाथ मुलांचा खर्च सरकार उचलणार

भुजबळ, वडेट्टीवार राजीनामा द्या; ओबीसी आरक्षणासाठी गुरुवारी भाजप ओबीसी मोर्चाचे आक्रोश आंदोलन

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...