AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीबीएसईप्रमाणं विद्यार्थी हिताचा निर्णय घ्या, प्रियांका गांधी यांचं बारावी संदर्भात मुख्यमंत्र्यांना आवाहन

प्रियांका गांधी  यांनी देशातील सर्व राज्यांच्या परीक्षा मंडळांना बारावीच्या परीक्षासंदर्भात सीबीएसई प्रमाणं निर्णय घेण्याचं आवाहनं केलं. Priyanka Gandhi Vadra

सीबीएसईप्रमाणं विद्यार्थी हिताचा निर्णय घ्या, प्रियांका गांधी यांचं बारावी संदर्भात मुख्यमंत्र्यांना आवाहन
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 6:02 PM
Share

नवी दिल्ली: काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी  यांनी देशातील सर्व राज्यांच्या परीक्षा मंडळांना बारावीच्या परीक्षासंदर्भात सीबीएसई प्रमाणं निर्णय घेण्याचं आवाहनं केलं आहे. सीबीएसई प्रमाण विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्या, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. प्रियांका गांधी यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. सीबीएसईच्या प्रमाणं राज्यांच्या बोर्डांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची बाजू ऐकून घ्यावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय जाहीर करावा. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा, त्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावं, असं प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या आहेत. (Priyanka Gandhi Vadra appeal to all states to follow CBSE Class 12th cancellation decision)

सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द विद्यार्थ्यांचं अभिनंदन

प्रियांका गांधी यांनी मंगळवारी सीबीएसई बोर्डानं 12 वी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला त्याबद्दल विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं होते.अखेर विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारनं दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. त्याप्रमाणं बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रानं हा निर्णय घेतला आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं. बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या:

Maharashtra HSC exam : बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेणार

CBSE, ICSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द, ‘या’ राज्यात परीक्षा चालू, विद्यार्थी थेट घरातून सहभागी

CBSE Board 12 Exam cancelled: बारावीच्या परीक्षा रद्द, मोदी सरकारचा मोठा निर्णय

(Priyanka Gandhi Vadra appeal to all states to follow CBSE Class 12th cancellation decision)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.