CBSE, ICSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द, ‘या’ राज्यात परीक्षा चालू, विद्यार्थी थेट घरातून सहभागी

केंद्र सरकारनं सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. Chhattisgarh cbgse class 12th exams

CBSE, ICSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द, 'या' राज्यात परीक्षा चालू, विद्यार्थी थेट घरातून सहभागी
exam

रायपूर: केंद्र सरकारनं सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईपाठोपाठ आयसीएसई बोर्डानं देखील बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. देशातील इतर राज्य देखील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे छत्तीसगडमध्ये मात्र बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवसांमध्ये परीक्षा संपणार आहेत. छत्तीसगडमध्ये बारावीच्या परीक्षा नेमक्या कशा सुरु आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. (Board exams Chhattisgarh cbgse class 12th exams started from 1 June know details)

1जूनपासून परीक्षेला सुरुवात

देशात बारावीच्या परीक्षांवर चर्चा सुरु असताना छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावीच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. विद्यार्थी त्यांच्या घरातून परीक्षेत सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिली गेली आहे. त्यांना पुढील पाच दिवसांमध्ये उत्तर पत्रिका जमा कराव्या लागतील. यापरीक्षेला 1 जून पासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना याप्रमाणे 6 जूनपूर्वी उत्तरपत्रिका जमा कराव्या लागतील. जे विद्यार्थी उत्तरपत्रिका मुदतीत जमा करणार नाहीत त्यांना अनुपस्थित ठरवलं जाईल.

उत्तरपत्रिका कशा जमा करायच्या

बोर्डाकडून देण्यात आलेल्या वेळेत उत्तरपत्रिका जमा करावी लागणार आहे. परीक्षा केंद्रांवर उत्तरपत्रिका द्याव्या लागतील. तिथे त्यांची हजेरी नोंदवावी लागेल. पोस्ट किंवा अन्य प्रकारे उत्तर पत्रिका स्वीकारल्या जाणार नाहीत. परीक्षा केंद्रांवर जाताना विद्यार्थ्यांनी मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.बारावी परीक्षेसाठी 2.71 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारनं दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. त्याप्रमाणं बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रानं हा निर्णय घेतला आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं. बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या:

CBSE Board 12th Exam: बारावीच्या परीक्षा 24 जुलैपासून?, शिक्षण मंत्रालयाचे 3 प्रस्ताव, PMO च्या मंजुरीची प्रतीक्षा

Maharashtra SSC exam hearing: दहावीच्या परीक्षा होणार की नाही? मुंबई हायकोर्टातील सुनावणी नेमकं काय घडलं?

(Board exams Chhattisgarh cbgse class 12th exams started from 1 June know details)