Pandharpur Bypoll Voting | मतदान केंद्रावर शुकशुकाट, कोविड रुग्णालयांसमोर रांगा; पंढरपुराची परिस्थिती चिंताजनक

पंढरपुरात मतदानाच्या माध्यमातून पुढचा आमदार ठरणार असला तरी मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. (corona patient pandharpur mangalwedha by election)

  • रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर
  • Published On - 16:06 PM, 17 Apr 2021
Pandharpur Bypoll Voting | मतदान केंद्रावर शुकशुकाट, कोविड रुग्णालयांसमोर रांगा; पंढरपुराची परिस्थिती चिंताजनक
PANDHARPUR

पंढरपूर : राज्यात एकीकडे कोरोनाच उद्रेक सरु आहे. रोज हराजो नवे रुग्ण आढळत आहेत. तर दुसरीकडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. आज 17 एप्रिल रोजी येथे प्रत्यक्ष मतदान होत आहे. निवडणूक म्हटलं ऐरव्ही वातावरण भारलेलं असतं. कार्यकर्ते, नेते अन्नपाणी सोडून विजयासाठी जीवाचं रान करत असतात. मात्र, यावेळी पंढरपुरात वेगळंच चित्र आहे. आज मतदानाच्या माध्यमातून येथे पुढचा आमदार ठरणार असला तरी मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. तर याउलट चित्र कोव्हीड हॉस्पिटलसमोर दिसत आहे. आपल्या रुग्णाला योग्य उपचार मिळावा म्हणून कोरोनाग्रस्ताच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर रांगा लावल्या आहेत. पंढरपूर शहरातील हा विरोधाभास येथील कोरोनाच्या स्थितीचे दर्शन घडवणारा आहे. (due to Corona patient Pandharpur Mangalwedha by election voting getting low response and large amount of people gathering in front of Covid hospital)

हाताच्या बोटावार मोजण्याइतकेच मतदार

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यात कोरोना संसर्ग वाढलेला असूनसुद्धा निवडणुकीचे वातावरण पाहता राज्य सरकारने विशेष बाब म्हणून या ठिकाणी नियमांमध्ये शिथिलतासुद्धा दिली होती. त्यानंतर आपलाच उमेदवार निवडून यावा म्हणून माहाविकास आघाडी आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघात मोठ्या सभा गाजवल्या. जलसंपादमंत्री जयंत पाटील यासारख्या दिग्गज नेत्याने तर भर पावसात सभा दणाणून सोडली. मात्र, आज मदतानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर बोटावर मोजण्याइतकीच मतदारांची संख्या आहे. सध्याची कोरोना महामारी आणि रणरणते उन याला कारणीभूत असावे असे सांगण्यात येत आहे.

रुग्णालयांसमोर कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांच्या रांगा

आज पंढरपुरा प्रत्यक्ष मतदान होत आहे. मात्र येथे मतदानाला प्रतिसाद कमी प्रमाणात मिळत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे पंढरपुरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढत असल्यामुळे रुग्णालयासमोर मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसत आहे. शहराच्या विविध कोविड हॉस्पिटलसमोर ही गर्दी झाली आहे. सध्या येथे ऑक्सीजन, रेमेडेसिव्हीरसह इतर औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी नातेवाईकांची रुग्णालयासमोर गर्दी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण जिंगणार याकडे सर्वांचे लक्ष

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज (17 एप्रिल 2021) मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे हे मतदान 12 तासांचे असणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे

इतर बातम्या :

आवताडे जिंकणार की भालके? काय आहे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचं गणित? वाचा सविस्तर

Pandharpur ByElection | पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

(due to Corona patient Pandharpur Mangalwedha by election voting getting low response and large amount of people gathering in front of Covid hospital)