
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसली. शेवटी दोघे एकत्र आले असून त्यांनी युतीची घोषणा केली. हेच नाही तर राज ठाकरे यांनी जाहीर केले की, मुंबई महापालिकेचा महापाैर मराठी होणार आणि आमचाच… एकप्रकारे त्यांनी थेट मोठा इशारा महायुतीला दिला आहे. राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता स्पष्ट झाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष एकत्र आगामी महापालिका निवडणुका लढतील. फक्त मुंबईच नाही तर 29 महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या जातील. एकत्र आलोय आणि एकत्र राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले असून फक्त मराठी माणसासाठी एकत्र आल्याचे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी बोलताना म्हटले की, उत्तरे देवांना द्यावेत. दानवांना नाही. देवा जेव्हा बोलेल तेव्हा… मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असे त्यांनी मोठे विधान करत महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ फिरत आहे. त्यात ते अल्लाह हाफीज म्हणत आहेत. त्यांनी मला या गोष्टी सांगू नये.
माझ्याकडे खूप व्हिडीओ आहेत. ते काय बोलतील त्यावर मी व्हिडीओ लावणार आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. फक्त हेच नाही तर मुख्यमंत्र्यांचे खूप सारे व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, त्यांच्या बोलण्यावर अवलंबून आहे की, हे व्हिडीओ कधी दाखवणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याच्या चर्चा होत्या.
हेच नाही तर संजय राऊतांनी याबद्दलचे मोठे संकेतही दिले होते. शेवटी तो क्षण आलाच आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. राज ठाकरे यांनी ऐतिहासिक युतीची घोषणा केली. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने एक नवीन ताकद मुंबईमध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे.