AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगल कलश महाराष्ट्रात आला… संजय राऊत यांचे मोठे भाष्य, दोन्ही ठाकरे…

राज्यात महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. त्यामध्येच आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे भाऊ एकत्र आले असून राज्यातील निवडणुका महायुती म्हणून लढणार आहेत.

मंगल कलश महाराष्ट्रात आला... संजय राऊत यांचे मोठे भाष्य, दोन्ही ठाकरे...
uddhav Thackeray
| Updated on: Dec 24, 2025 | 12:45 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. 15 तारखेला महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान होईल आणि 16 तारखेला निकाल लागेल. 29 महापालिकांचा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. शेवटी या निवडणुका होणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठाकरेंची मोठी युती झाली. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. दोघांनी युतीची घोषणा केली. भाजपाविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. राज्यातील महापालिका निवडणुका मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढवणार आहेत. राज ठाकरे हे महाआघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, महाविकास आघाडीला सोडून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. यावेळी संजय राऊतही उपस्थित होते. संजय राऊत म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे. मी सकाळी कुणाला तरी सांगितलं की आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रात आला तो मराठी ऐक्याचा मंगल कलश होता. आजही मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन राज आणि उद्धव आले आहेत.

तोच आनंदाचा क्षण घेऊन आले आहेत. हाच मंगल कलश मुंबईसह अनेक महापालिकेत विजयी भगवा फडकवल्याशिवाय राहू शकणार नाही. महाराष्ट्राला ठाकरेच नेतृत्व देऊ शकतात. महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे राहिल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी कालच जाहीर केले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर येतील आणि युतीबाबतची घोषणा करतील.

संजय राऊत यांनी कालच म्हटले की, सर्वकाही नियोजित आहे. आमच्यामध्ये जागांची चर्चा देखील झाली. उद्याच आम्ही निवडणुकीच्या महायुतीची घोषणा करू. त्याप्रमाणे आज त्यांनी घोषणा केली असून मुंबईत महापाैर मराठीच असणार आणि तोही आमचाच असा मोठा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. त्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. कधी भरायची ती कळवली जाईल. महाराष्ट्र ही प्रतिक्षा करत होता. शिवसेना आणि मनसेची युती झाली हे जाहीर घोषणा करत आहोत.

ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.
पुण्यात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं, पण ठाकरे सेनेचा विरोध
पुण्यात दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं, पण ठाकरे सेनेचा विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा पण मुंबईतली आकडेवारी काय?
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा पण मुंबईतली आकडेवारी काय?.
बिबटे अन् पोट्टे, राणा दाम्प्त्य म्हणाले, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला
बिबटे अन् पोट्टे, राणा दाम्प्त्य म्हणाले, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला.
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार
ऑल सेट... ठाकरे बंधूंचं ठरलं! आज 12 वाजता युतीची घोषणा होणार.
भाऊंच्या नाराजीची 'डरकाळी' संपली? भाजपात उपरे येऊन झाले गब्बर?
भाऊंच्या नाराजीची 'डरकाळी' संपली? भाजपात उपरे येऊन झाले गब्बर?.
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.