बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होणार पूर्ण, दोन्ही भाऊ एकत्र? संजय राऊत म्हणाले, काल रात्रीच..
राज्यातील महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. यादरम्यान युती आणि महाविकास आघाडीबद्दल जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. त्यामध्येच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले जाते.

महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यादरम्यान राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. नुकताच संजय राऊत यांनी याबद्दल मोठे विधान केले. संजय राऊत यांनी म्हटले की, काल रात्री जागा वाटप पूर्ण झालंय. मुंबईसह अनेक भागात कार्यकर्त्ये कामालाही लागले आहेत. सेना मनसे युतीबाबत कोणाच्याही मनात संभ्रम नाहीये. नाशिकमध्ये चर्चा आटपली आहे, पुण्यातही विषय संपलाय. कल्याण डोबिंवलीतील विषय संपला. ठाणे आणि मीरा भाईंदर पालिकेचाही आम्ही विषय संपवला. आता इतक्या पालिकांचे काम करत असताना थोडा वेळ लागत असतो. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. काही विद्यमान नगरसेवक असतात त्यांच्या जागांची आदलाबदल होत असते युतीमध्ये. त्याकरिता लोकांना एकत्र बसवून मार्ग काढावा लागतो.
आता या सर्व गोष्टी जवळजवळ पूर्ण झाल्या आहेत. मी आता थोड्यावेळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी बोलून आम्ही निर्णय घेऊ. एबी फॉर्मचेही वाटप झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, ठाकरेंची युती झाली आहे फक्त घोषणा बाकी आहे. ज्यापद्धतीने राज्यातील निकाल लावले गेले, ज्यापद्धतीने बिहारचे निकाल लावले गेले आणि लोकशाहीचा गळा घोटला जातो.
निवडणूक आयोगापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंतच्या सर्व संस्था भारतीय जनता पार्टी पायाखाली तुडवत आहे, त्यावर आता जर बोललो नाही तर नंतर उशीर झाला अशा भावना मरताना आल्यापेक्षा जिवंत असताना आलेल्या बऱ्या. आमच्यासारखे लोक जिवंतपणे लढत आहेत आणि जिवंत माणसे पाच वर्ष वाट बघत नाहीत. महाराष्ट्र हे जिवंत माणसांचे राज्य आहे.
राज ठाकरे उद्धव ठाकरे आम्ही सर्वजण एकमेकांच्या संवादात आहोत. जोपर्यंत जागा वाटप जाहिर होत नाही तोपर्यंत कोणतीही युती पूर्ण होत नाही ना.. आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत आणि मनापासून एकत्र आहोत. जागा वाटपाबद्दल कुठेही ताणतणाव आणि रस्सीखेच नाहीये. भांडूप आणि इतर जे काही भाग तुम्ही बोलत आहोत, ते त्यांच्याकडे गेले का आणि आमच्याकडे राहिले हे सर्व एकच आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
