Traffic Advisory : मुंबईकरांनो.. हे वाचाच ! दसरा मेळाव्यामुळे अनेक मार्ग बंद, बाहेर पडण्याआधी चेक करा लिस्ट
दसरा मेळाव्यामुळे 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत. अनेक रस्ते बंद राहतील, तर काही ठिकाणी प्रवेशबंदी असेल. शिवाजी पार्क येथील मेळाव्यामुळे वाहनांना गर्दी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी खबरदारी घेतली असून, पर्यायी मार्गांची घोषणा केली आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी मार्ग बदल तपासणे आवश्यक आहे.

देवीचा सण असलेला, नवरात्रोत्सव संपण्यास आता अवघे काही दिवस उरले असून येत्या गुरूवारी, म्हणजेच 2 ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसरा आहे. या दिवशी अनेक जण सणानिमित्त नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेर पडतात. पण राज्यात याच दिवशी अनेक पक्षांचा दसरा मेळावाही असतो. मुंबईत शिवाजी पार्क येथे शिवसेना ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यानिमित्ताने मोठी गर्दी होऊ शकतेय
याच दसऱा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत अनेक मार्गात बदल होणार आहे तर अनेक मार्गात प्रवेश बंदी असणार आहे. मोठ्या संख्येने मुंबईत गाड्या येण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. काही रस्ते बंद करण्यात येणार तर काही मार्गात बदल केला आहे. त्याविषीय माहिती खालीलप्रमाणे –
वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते
१. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते एस बँक सिग्नल)
२. केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), दादर.
३. एम. बी. राऊत मार्ग, (एस. व्ही. एस. रोड) दादर.
४. पांडुरंग नाईक मार्ग, (एम. बी. राऊत रोड) दादर
५. दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक) दादर ६. दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. ५ ते शितलादेवी रोड) दादर.
७. एन. सी. केळकरमार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक), दादर
८. एल.जे. रोड, राजा बडे जंक्शन ते गडकरी
वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग व पर्यायी मार्ग
१. स्वातंत्र वीर सावरकर मार्ग (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन)
पर्यायी मार्ग – सिध्दिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.
२. राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शन येथपर्यंत.
पर्यायी मार्ग – एल. जे. रोड, गोखले रोड-स्टिलमॅन जंक्शन वरून पढे गोखले रोड चा वापर करतील.
३. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथुन दक्षिण वाहीनी.
पर्यायी मार्ग – राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.
४. गडकरी चौक येथुन केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर.
पर्यायी मार्ग – एम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
