Mumbai: सर्वात भयंकर मासा, चावा घेताच मच्छिमारासोबत भयंकर घडलं… डॉक्टरही चकीत
Eel Fish bite Fisherman : मीरा-भाईंदरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तन किनाऱ्यावर मासेमारी करताना 42 वर्षीय मच्छीमाराच्या हाताला ईल (वाम) माशाने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. वाम माशाच्या चाव्यामुळे हात कापण्याची वेळ आली होती मात्र डॉक्टरांनी त्याचा हात वाचवला आहे.

मीरा-भाईंदरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तन किनाऱ्यावर मासेमारी करताना 42 वर्षीय मच्छीमाराच्या हाताला ईल (वाम) माशाने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. हा चावा सामान्य चावा नव्हता. वाम माशाच्या चाव्यामुळे हात कापण्याची वेळ आली होती. मात्र वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड येथील डॉक्टरांनी वेळीच शस्त्रक्रिया करून त्यांचा हात वाचवला आहे. या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.
ईल माशाने घेतला चावा
समोर आलेल्या माहितीनुसार संदीप भोईर हे उत्तन किनाऱ्यावर मासेमारी करत होते. यावेळी यांना ईल माशाने संदीप यांच्या डाव्या मनगटावर दोनदा चावा घेतला. यामुळे त्यांच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि हाताला सूज आली होती. त्यांचे रक्ताभिसरण कमी झाले होते, त्यांना संवेदना जाणवत नव्हत्या. त्यांना बोटे हलवता येत नव्हती. तसेत त्यांना असह्य वेदना होत होत्या. जवळपास 17 तास हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर त्यांना ॲक्युट कम्पार्टमेंट सिंड्रोम असल्याचे निदान झाले. या आजारात रक्तपुरवठा बंद होतो. यामुळे त्यांचा हात कापण्याची वेळ आली होती. मात्र डॉक्टरांनी त्यांचा हात वाचवला आहे.
फॅसिओटोमी शस्त्रक्रियेने हात वाचला
वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टर सुशील नेहेते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने फॅसिओटोमी शस्त्रक्रिया करून हातातील रक्तप्रवाह पुन्हा सुरू केला. आयसीयू टीमच्या दक्षतेमुळे किडनी फेल्युअरचा धोका टळला आणि रुग्णाची स्थिती सुधारली. सध्या संदीप भोईर यांचा हात बरा होत असून, लवकरच स्किन ग्राफ्टिंगनंतर ते पूर्णपणे सावरण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे.
बोटांची हालचाल सुरू
या सर्जरीबाबत बोलताना डॉ. नेहेते म्हणाले की, ‘रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा त्याच्या हातातील रक्ताभिसरण पूर्णपणे थांबले होते. आणखी विलंब झाला असता तर स्नायूंचे मोठे नुसकान झाले असते. आम्ही हाताच्या हाडांमध्ये आणि कार्पल बोगद्यात दाब कमी करण्यासाठी फॅसिओटॉमी शस्त्रक्रिया केली, ज्यामुळे रक्त प्रवाह त्वरित पूर्ववत झाला. आता काही दिवसांनी संदीप यांनी पुन्हा संवेदना जाणवू लागल्या असून ते हालचाल करू लागले आहे.
