AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने मला एबी फॉर्म दिला होता; एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा

पक्ष सोडण्यासाठी काही कारण हवं म्हणून खडसेंनी मला व्हिलन ठरवलं असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. यावर प्रत्युत्तर देताना खडसेंनी मोठी गौप्यस्फोट केला आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने मला एबी फॉर्म दिला होता; एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा
| Edited By: | Updated on: Oct 22, 2020 | 1:56 PM
Share

जळगाव : ‘विधानसभेला जेव्हा मला तिकीट नाकारण्यात आलं तेव्हा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म माझ्याकडे रेडी होता. मी तेव्हाच पक्ष सोडून निवडून आलो असतो’ असा मोठा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. ‘निवडणुकांवेळी माझ्याकडे एबी फॉर्म तयार होता. राष्ट्रवादीतून मी निवडून आलो असतो. त्यावेळी अजित पवार, वळसे पाटील यांनी मला फोन केले होते. मी तेव्हाच जिंकलो असतो’ असं खडसे म्हणाले आहेत. टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर आणि फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. (eknath khadse big statement ncp ab form was ready in vidhan sabha)

खरंतर, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत भाजपचा निरोप घेतला. यावर पक्ष सोडण्यासाठी काही कारण हवं म्हणून खडसेंनी मला व्हिलन ठरवलं असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. यावर प्रत्युत्तर देताना खडसेंनी मोठी गौप्यस्फोट केला आहे.

राज्यात मान्सून परतीच्या मार्गावर, ‘या’ जिल्ह्यांमध्ये हलका ते मुसळधार पावसाची शक्यता

काय म्हणाले एकनाथ खडसे? भाजप स्थापन झाल्यापासून पक्षाचं काम एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलं. त्या कालखंडात परिस्थिती फार अवघड होती. आणीबाणीनंतर भारतीय जनता पार्टीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ती जनमानसात रुजलेली नव्हती. कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी नव्हते. त्यावेळी गावागावांत उपेक्षा सहन करावी लागायची. पण सर्वांच्या मेहनतीने भाजपला आज अच्छे दिवस आले. त्याचा मला नेहमी आनंद राहिला आहे.

(eknath khadse big statement ncp ab form was ready in vidhan sabha)

पूर्वीच्या कालखंडातील आमचे नेते सामूहिक नेतृत्वाच्या अनुषंगाने काम करायचे. सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय व्हायचा. तो सर्वांकडून मान्य करुन निर्णय व्हायचा. पण अलिकडच्या काळात भाजप व्यक्तीगत आहे. एकाच व्यक्तीने निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशा स्वरुपाची आहे. निर्णय आधीच ठरलेला असायचा, फक्त नावापुरता विचारलं जायचं.

लग्नाची मागणी घालण्यासाठी येणाऱ्या तरुणाने लुटलं, तरुणीला तब्बल साडेसहा लाखांचा गंडा

‘फडणवीसांना व्हिलन ठरवलं नाही’ मी फडणवीसांना व्हिलन ठरवलं नाही. कोणत्याही निर्णयाचे चांगले-वाईट परिणाम होतात. चांगले परिणाम झाले तर गुणगाण होतं. जे वाईट झालं ते नेतृत्वाने का स्वीकारु नये? अलिकडच्या काळात माझ्यासोबत व्यक्तीगत घटना घडल्या आहेत त्या वेदनादायी होत्या. माझ्या चौकश्या केला. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. याचा मला प्रचंड मनस्ताप झाला.

‘देवेंद्र यांना दोष का दिला?’ विनयभंगाचा खटला कसा दाखल झाला. माझं भाषण मुक्ताईनगरला सुरु होतं. भाषणात मी काहीच अश्लील बोललो नाही. माझ्या शेताच्या आंब्याचा विषय होता. यावरुन अंजली दमानिया यांनी गुन्हा दाखल करायला भाग पाडलं. वास्तविक विनयभंगाचा गुन्हा करायचा असेल तर समोर व्यक्ती लागते. कुणी अमेरिकेत राहिलं आणि मी मुक्ताईनगरला राहिलो तर तसे गुन्हे दाखल होत नाहीत.

देवीच्या मंदिरातील भुस्खलनाचा थरारक CCTV, 5 भक्त ढिगाऱ्याखाली अडकले

(eknath khadse big statement ncp ab form was ready in vidhan sabha)

Follow Us
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...