हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पर नही.. जळगावात नाथाभाऊंचा शेर आणि उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ खडसेंनी विश्वासघात केल्याचा आरोप गिरीश महाजन करत आहेत. त्यावर दोघेही अनेक कार्यक्रमांतून आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काल आणखी एका कार्यक्रमात खडसेंनी महाजनांवर टीका केली.

हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पर नही.. जळगावात नाथाभाऊंचा शेर आणि उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट
जळगावात एकनाथ खडसे यांची शेरो शायरी
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 9:42 AM

जळगावः जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत आमचा विश्वासघात झाल्याची टीका करत भाजप नेते, गिरीश महाजन (Girish Mahaja) यांनी माघार घेतली होती. त्यानंतर बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा विजयी ध्वज फडकला. मात्र त्यानंतर एकनाथ खडसे गिरीश महाजनांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. जळगावमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी , हम तो शेर पर एहसान किया करते है… या आशयाचा शेर मारला. गिरीश महाजनांचे नाव न घेता त्यांनी हा टोमणा मारला आणि उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंनी विश्वासघात केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र हा विश्वासघात नसून हे राजकारण असल्याचा टोला यापूर्वीही एका कार्यक्रमात लगावला होता. काल जळगावात झालेल्या आणखी एका कार्यक्रमात त्यांनी शहरातील विविध विकासकामांमध्ये ‘नाथाभाऊ’ ची मेहनत आहे, याचे स्पष्टीकरण देतानाच पुन्हा एकदा गिरीश महाजनांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले,

हम तो शेर पर एहसान किया करते है हम चुहे पे कभी एहसान नही करते तुम्हारे जैसे दुसरो के पर हम नही काटते….

गिरीश महाजनांसमोर नाथाभाऊंचे आव्हान

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जळगावातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीने जिल्हा बँकेवर सत्ता स्थापन केली. भाजप नेते गिरीश महाजन यांनीदेखील निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र ऐन वेळी भाजपने बहिष्काराचे अस्र उगारत माघार घेतली. त्यामुळे जिल्हात अजूनही नाथाभाऊंचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आगामी काळातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे पारडे जड झाल्यास गिरीश महाजन यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. आता जिल्हा परिषदेवरील सत्ता मिळवण्यासाठी भाजपला जोरदार मोर्चेबांधणी करावी लागत आहे.

इतर बातम्या-

HSC and SSC board exam date : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, परीक्षा कधीपासून? वाचा सविस्तर

कल्याण-डोंबिवलीत येत्या आठवड्यापासून अनधिकृत बांधकांमावर हातोडा; किती बांधकामे तोडणार?

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.