AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Monsoon Session | मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेला शिंदे गटाचा एका आमदार मिलिंद नार्वेकर यांना भेटला

Maharashtra Monsoon Session | या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. सर्वसामान्यांना महाराष्ट्रात कुठल्याच पक्षावर विश्वास उरलेला नाही. कधी, काय घडेल, याचा नेम नाहीय.

Maharashtra Monsoon Session | मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेला शिंदे गटाचा एका आमदार मिलिंद नार्वेकर यांना भेटला
Milind Narvekar-Uddhav Thackeray
| Edited By: | Updated on: Jul 19, 2023 | 1:44 PM
Share

मुंबई : राजकारणात कधी, काय घडेल? याचा नेम नसतो. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्याच गोष्टीची शाश्वती राहिलेली नाही. मागच्यावर्षी शिवसेनेत बंड झालं. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. हे चित्र पाहिल्यानंतर सर्वसामान्यांना महाराष्ट्रात कुठल्याच पक्षावर विश्वास उरलेला नाही. कधी, काय घडेल, याचा नेम नाहीय. मागच्या अधिवेशनात विरोधी बाकावर बसणारे आता सत्ताधारी आहेत.

सत्ता आणि विचारधारा यामध्ये सत्तेच पारडं जड झालेल दिसतय. राजकारणातील हे बदल सर्वसामान्य जनतेला चक्रावून टाकणारे आहेत.

मंत्रिपदाकडे डोळे

मागच्यावर्षी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. यावर्षी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत सहभागी झाला. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेना-भाजपामधील अनेक आमदार मागच्यावर्षीपासून मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहेत.

आमदारांच्या पदरी प्रतिक्षाच आली

त्याच्या नशिबी अजूनही प्रतिक्षाच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी जोरदार चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या काही आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असताना, त्यांनी तसे दावे सुद्धा केले होते. पण मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही. त्यामुळे या आमदारांच्या पदरी प्रतिक्षाच आली.

तूर्तास ते वेट अँड वॉचवर

मंत्रिपदाच्या शर्यतीत शिवसेनेकडून आघाडीवर असलेलं नाव म्हणजे भरत गोगावले. ते महाडचे शिवसेना आमदार आहेत. भरत गोगावले यांना मंत्रिपदाबरोबर रायगडच पालक मंत्री पद हवं आहे. त्यांनी, आपल्याला मंत्रिपद मिळणार असे संकेत सुद्धा दिले होते. पण तूर्तास ते वेट अँड वॉचवर आहेत.

कुठे झाली भेट?

आज विधिमंडळ परिसरात भरत गोगावले यांनी मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. राजन साळवी, भरत गोगावले आणि मिलिंद नार्वेकर एकत्र बोलत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. गोगावले नार्वेकर यांना भेटल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील काही आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत होता. उदय सामंत यांच्या पालकमंत्री पदाबद्दल काय म्हणाले?

“राज्यामध्ये पूर परिस्थिती आहे, पण उदय सामंत रायगडचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे या पुराचा काही परिणाम होईल असे मला वाटत नाही. एनडीआरएफ तयार आहे” असं भरत गोगावले म्हणाले. “रायगडची परिस्थिती नियंत्रणामध्ये एवढेच मी सांगेन. दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांना जो मानसन्मान दिला आहे, तो योग्यच आहे. उदय सामंत हे पालकमंत्री रायगडचे आहे. मी झालो नाही, झालो काय फरक पडत नाही पण ते योग्य काम करतायत” असं भरत गोगावले म्हणाले.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.