AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जो काम करेल, तोच… महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंचा कानमंत्र

आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे आश्वासन दिले आहे. 'लाडकी बहीण योजना' कधीही बंद होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आणि दिलेला शब्द पाळणार अशी ग्वाही दिली.

जो काम करेल, तोच... महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंचा कानमंत्र
eknath shinde 1
| Updated on: Nov 10, 2025 | 11:25 AM
Share

आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीमुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी मी एकदा शब्द दिला की दिला, मग मी तो पूर्ण करतो, असे ठाम आश्वासन जनतेला दिले. ते ठाणे येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि सांगली येथे बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमात बोलत होते.

ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एक मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय धोरणे स्पष्ट करत विरोधकांना लक्ष्य केले. यावेळी त्यांनी मागील सरकारच्या कार्यपद्धतीवर थेट टीका केली.

कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही

“या अगोदरचे सरकार हे स्थगिती सरकार होते. मात्र, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासातील सगळे स्पीड ब्रेकर काडून टाकले. विकासाच्या मुद्यावर तुम्ही आलात. त्यामुळे मी शब्द देतो, विकासाच्या कामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शहरातील धोकादायक इमारतींचे कामही सरकार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना शाश्वत आहे. राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असे ठामपणे सांगितले. यामुळे महिला मतदारांना दिलासा मिळाला. यावेळी एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल” असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच विकास म्हात्रे आगे बडो, हम तुम्हारे साथ है” अशी घोषणाही त्यांनी दिली.

एकदा शब्द दिला की तो पाळा

तसेच एकनाथ शिंदे यांनी सांगलीतील बोरगाव येथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या भव्य बैलगाडी शर्यत कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वचनपूर्तीच्या धोरणावर विशेष भाष्य केले. “मै एक तो कमिटमेंट करता नाही, और एक बार कमिटमेंट कर दी, तो फिर खुद्द की भी नही सुनता!”, असा थेट एक डायलॉग त्यांनी मारला. यानंतर ते म्हणाले की एकनाथ शिंदे, हा शब्द दिला की शब्द पूर्ण करतो. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा विचार करा आणि एकदा शब्द दिला की तो पाळा. त्यामुळे मी एकदा शब्द दिला, की माघारी नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?