शिंदेंचा पॉवर गेम, भाजपवर नेम
विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजप आणि शिवसेनेतील मतभेद चर्चेत आले आहेत. नागपूर आणि पुण्यातील निकालांनी शिंदेंच्या राजकीय ताकदीचा नवा संदेश दिला का? त्यातच फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

विधान परिषदेतल्या पराभवानंतर भाजप शिवसेनेत घमासान सुरु आहे. फडणवीस गडकरी आरएसएसच्या अंगणात कॉग्रेसनं भाजपच्या नाकाखालून नागपूर पदविधरमध्ये विजय खेचून तर पुणे माझं दुसरं घर म्हणणा-या फडणवीसांना तेल लावलेल्या पैलवानाने पदविधर निवडणूकीत धोबीपछाड दिला. या दोन्हा जागांवरचा पराभव म्हणजे बाजपची दुखरी नस बनलाय. या पराभवानंतर भाजपला वाटतंय शिंदेंनी भाजपचा केसानं गळा घेतला कापला.
विधानरिषद निवडणुक जाहिर झाल्यावर बाजपनं परस्पर उमेदवार जाहिर करुन टाकले. तिथेच वादाची ठिणगी पडली. मित्रपक्षांना गृहीत धरणे, बंडखोरांची मनधरणी न करणे आणि अंतर्गत गटबाजी या प्रमुख कारणांमुळे महायुतीला तीन जागा गमवाव्या लागल्या.
पुण्यातून शिंदेंचे निकटवर्तीय मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली. त्याने शिंदे नाराज झाले. शिंदेंच्या नाराजीची किंमत भाजपला नागपूर आणि पुण्यात मोजावी लागली.
मातोश्रीला धक्का देणारे एकनाथ शिंदे वाटतात तितके कच्चे खिलाडी नाहीत. हे भाजप विसरली भाजपची सर्वात जास्त चिडचिड homeground वरच्या पराभवाने झालीय. पुण्यात काय होतं याचं शिंदेना काही घेणं देणं नव्हतं. शिंदेचं लक्ष होतं ते नागपूरकडे.
या निवडणूकीतून शिंदेंनी भाजपला गर्भित इशारा दिलाय…
हलक्यात घेउ नका. हा संदेश निवडणूकीच्या माध्यमातून शिंदेनी दिलाय. गृहित धरलंत किंवा साईडलाईन करायचा प्रयत्न केलात किंवा कोंडी करायचा पर्यत्न केला तर तुमचा विजय सोपा नसेल. शिवसेनेच्या मदतीशिवाय तुम्ही जिंकू शकत नाही. हे एक शब्दही न बोलता शिंदेंनी कृतीतून दाखवून दिलं. आम्ही उठाव केला नसता तर काय परिस्थीती असती हे उदय सामंत उघडपणे म्हणालेत.
आता भाजपनं केलेल्या चुका पाहुया
स्वबळावर जिंकू शकतो हा overconfidence नडला. शिंदेंना कमी लेखण्याची चुक केली. काँग्रेसच्या नेते एकत्र काम करणार नाहीत याकडे बाजपनं लक्ष ठेवलं पण त्याच वेळी पवारांची खेळी समजण्यात भाजप कमी पडली. पवारांनी मतदानाच्या एक दिवस आधी निलंबित केलं. कराळे मास्तर ओक्सबोक्शी रडले आणि कराळेंची 10 हजार मतं वाढली. तेच भाजपच्या पराभवाचं कारण ठरलं. मराठवाडा आणि पुण्यात शिंदेंच्या नेत्यांनी उघडपणे पवारांच्या उमेदवारांना मदत केली.
तुम्ही महायुतीत आहात महायुतीचा घर्म पाळा असा इशारा प्रविण दरेकरांनी शिवसेनेला अर्थात शिंदेंना दिला. यावर आम्ही महायुतीचा धर्म पाळतो … सर्वांनीच पाळायला हवा असं शांतपणे म्हणत शिंदेंनी पलटवार केला.
शिवसेनेनं मदत केली नाही म्हणून पराभव झाला. म्हणजे पराभवाचं खापर शिंदेवर फोडण्याच्या नादात पराभवानं बिथरलेल्या भाजपच्या नेत्यांनी शिंदेंचं महत्व वाढवलं. शिंदेंशिवाय आपण जिंकू शकत नाही हे भाजपचेच नेते म्हणताहेत. यानं शिंदेंसाठी तर win win condtion झाली. भाजपचं एक वैशिष्ट्य आहे भाजप पराभवातून शिकते आणि त्यावर तोडगा काढते. आजचंच बघा एका पुस्तक प्रकाशनाला फडणवीस आणि ठाकरे बंधू अकाच मंचावर आलेत. फडणवीस आणि ठाकरे बंधूची बंद दाराआड चर्चा ही झाली, ही चेकमेट तयारी आहे का?