AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची ताकद वाढली; मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. कारण करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (बापू) पाटीलसुद्धा उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची ताकद वाढली; मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
Eknath Shinde and Jaywant JagtapImage Credit source: Tv9
| Updated on: Jun 11, 2025 | 8:59 AM
Share

करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राजकीय धक्कातंत्र वापरत मुंबई इथल्या मुक्तागिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (बापू) पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख आणि शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे, शिवसेनेचे करमाळा – माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सांगलीचे विठ्ठल पाटील, सिंदखेडराजा जि. बुलढाण्याचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे .

जयवंतराव जगताप दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते. 1990 साली अपक्ष तर 2004 साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आमदार झाले होते. 2019 मध्ये विधानसभेला संजय (मामा) शिंदे यांना विजयी करण्यात आणि 2024 मध्ये नारायण (आबा) पाटील यांना विजयी करण्यात जयवंतराव जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. माजी आमदार जगताप यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक देशभक्त स्व. नामदेवराव जगताप चार वेळा आणि चुलते स्व. अण्णासाहेब जगताप एक वेळेस आमदार होते. जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला फार मोठा लाभ होणार आहे. लवकरच करमाळा येथे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असल्याचं समजतंय.

एकनाथ शिंदे हे विकासाचा दृष्टिकोन असलेले नेतृत्व असून त्यांच्याच नेतृत्वाखाली धनुष्यबाण चिन्हावर करमाळा नगरपालिकेवर, पंचायत समितीवर आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत भगवा फडकवणार असल्याचा निर्धार माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केला.

प्रवेशावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (बापू) पाटीलसुद्धा उपस्थित होते. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. जयवंतराव जगताप हे 1990 आणि 2014 असे दोन वेळा करमाळ्याचे आमदार राहिले आहेत. दरम्यान जयवंतराव जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटात एकाच आठवड्यात दोन माजी आमदारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्याने पक्ष संघटना मजबूत होतेय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.