…अन् डोळ्यातून अश्रू आले; एकनाथ शिंदेंनी सांगितला कारगिल विजयभूमीच्या भेटीचा अनुभव
एकनाथ शिंदे यांनी कृतज्ञता सन्मान सोहळ्याला हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर त्यांनी कारगिल युद्ध स्मारकाच्या भेटीच्या आठवणी सांगितल्या.

कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक व वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारगिल विजयभूमीच्या भेटीचा अनुभव सांगितले. कारगिल युद्ध स्मारकाजवळ संग्रहित केलेल्या शहीद सैनिकांची पत्रे वाचल्यानंतर डोळ्यातून अश्रू आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘कारगिल विजय दिवसनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात वीर सैनिक, त्यांची वीर पत्नीचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात काही आमचे वीर जवान देखील होते. कारगिलमध्ये जाऊन पाकिस्तानशी युद्ध झालं. त्यावेळी आव्हानात्मक घटना होती. युद्धात आमचे वीस ते पंचवीस वयोगटातील वीर जवान शहीद झाले. तरीही आम्ही कारगिल सोडलं नाही. त्यामुळे मी त्यांना अभिवादन करतो.
अन् डोळ्यात आले अश्रू
‘कारगिलला भेट देण्यासाठी दोन वेळा गेलो होतो. तिकडे जाण्याचं सौभाग्य मिळालं. तिकडे गेल्यावर सैनिकांनी कुटुंबांना लिहिलेले पत्र लिहून डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी स्वत:ची चिंता केली. कुटुंबाची चिंता कमी केली. परंतु देशाची सेवा केली. देशाची रक्षा केली. ही मोठी बाब आहे. मी शहीद जवानांना अभिवादन करतो, असे शिंदे यांनी पुढे सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदे यांनी रविवारी जंतरमंतरवरील आंदोलनावरून राहुल गांधींवर गंभीर आरोप केला. ‘काही जण दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर न जाता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी गेले. पंतप्रधानांचं निवासस्थान उच्च सुरक्षेचं आहे. इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. त्यानंतर एसपीजीचा कायदा लागू करण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ कोणतंही आंदोलन करता येत नाही. याची कल्पना राहुल गांधी यांना कल्पना होती. तरीही जाणीवपूर्वक आंदोलन केलं. लाखो लोकांना बोलवण्यात आलं. पंतप्रधानांच्या निवावस्थानी घातपात घडवून आणण्याचा गांधींचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप केला. बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंकेसारखी भारतातही अराजकता पसरवण्याचा उद्देश राहुल गांधींचा होता, असाही आरोप शिंदेंनी केला.
