AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला खासदाराचा संजय राऊतांबद्दल धक्कादायक दावा, विश्वास ठेवणं कठीण

Shivsena : "हे सर्व मर्यादा ओलांडणारे प्रकार आहेत. यापूर्वीही एका व्यक्तीने आपल्या आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या विषयावर मी येत्या अधिवेशनात प्रस्ताव आणणार आहे"

Shivsena : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महिला खासदाराचा संजय राऊतांबद्दल धक्कादायक दावा, विश्वास ठेवणं कठीण
Sanjay Raut
| Updated on: Jun 13, 2026 | 3:52 PM
Share

मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. ऑपरेशन टायगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलवली आहे. येत्या 14 जूनला म्हणजे उद्या मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी, ये डर अच्छा हैं… ही भीती असली पाहिजे…असं वक्तव्य केलं आहे. ज्योती वाघमारे शिवसेनेच्या राज्यसभा खासदार आहेत. ऑपेरशन टायगरबाबत एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका मांडली आहे असं त्या म्हणाल्या.

मध्यंतरी उद्धव ठाकरे गटाच्या काही खासदारांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. यात नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार संजय पाटील हे दोघे आहेत. धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. “ओमराजे निंबाळकर बैठकीला का उपस्थित नव्हते हे ते सांगू शकतील. पण खासदार उपस्थित राहत नाही ही बाब गंभीर आहे” असं त्या म्हणाल्या.

संजय राऊत यांच्याबद्दल धक्कादायक दावा

संजय राऊत यांच्यावर त्यांनी बोचरी टीका केली. “संजय राऊत यांना कुणी विचारत नाही, त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल की नाही ते देखील माहित नाही. ते स्वतः काँग्रेसच्या वाटेवर आहेत” असा ज्योती वाघमारे यांनी दावा केला. संजय राऊत शिवसेना सोडणार आणि काँग्रेसमध्ये जाणार यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. “आमचा हिंदुत्वाचा पक्ष आहे. राऊतांच्या पक्षाने हिंदुत्व सोडलय. काँग्रेस सोबत सलगी केली आहे” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.

प्रणित मोरे वादावरही भाष्य

सध्या राज्यात गाजत असलेल्या प्रणित मोरे वादावरही त्यांनी भाष्य केलं. “हे सर्व मर्यादा ओलांडणारे प्रकार आहेत. यापूर्वीही एका व्यक्तीने आपल्या आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या विषयावर मी येत्या अधिवेशनात प्रस्ताव आणणार आहे. आम्ही या प्रकाराचा निषेध करतो. यात महिलांचाही समावेश आहे.घाणेरडी आणि गलिच्छ वक्तव्ये करायची आणि नंतर माफी मागायची, अशी पद्धत काही जणांनी सुरू केली आहे. अशा प्रकारचे शो आयोजित केले जात आहेत” असं त्या म्हणाल्या.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं