AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आताची सर्वात मोठी बातमी; उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का, दिल्लीत घडामोडींना वेग

शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत नेत्यांचे प्रवेश सुरूच आहेत. एकनाथ शिंदे हे आता आणखी एक मोठा धक्का उद्धव ठाकरेंना देण्याच्या तयारीमध्ये आहेत.

आताची सर्वात मोठी बातमी; उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का, दिल्लीत घडामोडींना वेग
| Updated on: Feb 11, 2025 | 6:09 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं महायुतीला जोरदार दणका दिला होता, महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागनम केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला जेमतेम पन्नासचाच आकडा गाठता आला, दरम्यान या पराभवानंतर महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.

येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. पुण्यातील काही नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.    काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील या देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमलता पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नगरसेवक देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे सर्व प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी म्हटलं आहे की,  राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेकांना काम करायचं आहे,  एकनाथ शिंदे मुंबईमध्ये असताना कामात बिझी असतात, म्हणून अनेक लोक दिल्लीत आले आहेत. त्यामुळं दिल्लीत हे पक्षप्रवेश होत आहेत, असं मस्के यांनी म्हटलं आहे.

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?