AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीतील शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक, डॉक्टरांना मारहाण भोवली

डोंबिवलीतील एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याचे प्रकरण त्यांना भोवले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

डोंबिवलीतील शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक, डॉक्टरांना मारहाण भोवली
assaulting doctors
| Updated on: Jul 08, 2026 | 5:50 PM
Share

डोंबिवली येथील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना डॉक्टरांना मारहाण केल्या प्रकरणात अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टर आणि नर्स मारहाण केल्याने नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर टीका करण्यात येत होती. अशा प्रकारे डॉक्टरांना लोकप्रतिनिधी मारहाण करु लागले तर डॉक्टरांनी काम कसे करायचे असे म्हणत विरोधकांनी विधीमंडळात हा मुद्दा चर्चेला आणत कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे रमेश म्हात्रे यांच्या सह तिघांना अखेर विष्णू नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना कल्याण कोर्टात हजर करण्यात आले आहे. या तिघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मारहाण करणाऱ्या आरोपींच्या अडचणीत वाढ

रमेश पवार,  अक्षय कारंडे आणि प्रमोद निकम अशी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांवर सरकारी कामकाजात अडथळा, डॉक्टरांना जीवे मारण्याचा प्रयत्न अशा प्रकराची कलमे लावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना विष्णू नगर पोलिसांनी  कल्याण कोर्टात हजर केले आहे. या तिघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे याला देखील अटक केल्याचे म्हटले आहे.

ओपीडी बंद ठेवून निषेध

डोंबिवलीत शास्रीनगर रुग्णालयात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवून निषेध आंदोलन सुरु केले होते. या प्रकरणात विधीमंडळात उबाठा सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणात शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि उबाठाचे खासदार विनायक राऊत यांनी शास्रीनगर रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांची बाजू जाणून घेतली.

काय आहे नेमके प्रकरण

डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिला रुग्णाच्या नवजात बाळाला उपचारासाठी NICU बेडची गरज होती. रुग्णालयातील सर्व बेड पूर्ण भरलेले असल्याने, ऑन-ड्यूटी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी या बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. यावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि आरोपींनी डॉक्टरांशी हुज्जत घालत त्यांना मारहाण केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यात नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे सहकारी सेवेतील डॉक्टरांना मारहाण करताना दिसत आहेत. 

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक