Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे बंड हा शिवसेनाचा अंतर्गत प्रश्न, शरद पवार यांनी केले हात वर, मुख्यमंत्र्यांशी संवाद झाले नसल्याचे स्पष्ट, विरोधकांत बसण्याची तयारी

शिवसेनेची आज संध्याकाळी बैठक होणार आहे, त्यात त्यांची भूमिका स्पष्ट होईल. तो निरोप कळाल्यानंतर आम्ही आमची पुढील भूमिका ठरवणार आहोत, असेही शरद पवार यांनी सांगितले. आवश्यकता भासल्यास विरोधी बाकांवर बसण्याची तयारी असल्याचे संकेतही पवारांनी दिले आहेत. एकूणच या प्रकरणात शरद पवार यांनी पूर्णपणे हात वर केल्याचे दिसते आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे बंड हा शिवसेनाचा अंतर्गत प्रश्न, शरद पवार यांनी केले हात वर, मुख्यमंत्र्यांशी संवाद झाले नसल्याचे स्पष्ट, विरोधकांत बसण्याची तयारी
Pawar and Shivsena (1)Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 2:43 PM

नवी दिल्ली – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचे बंड हा शिवसेनेचा अंतरग्त प्रश्न आहे, त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा असल्य़ास शिवसेना काय निर्णय घेणार, हे त्यांचे ते ठरवतील, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (NCP Sharad Pawar)पवार यांनी या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वृत्तानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्याशी चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेची आज संध्याकाळी बैठक होणार आहे, त्यात त्यांची भूमिका स्पष्ट होईल. तो निरोप कळाल्यानंतर आम्ही आमची पुढील भूमिका ठरवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. आवश्यकता भासल्यास विरोधी बाकांवर बसण्याची तयारी असल्याचे संकेतही पवारांनी दिले आहेत. एकूणच या प्रकरणात शरद पवार यांनी पूर्णपणे हात वर केल्याचे दिसते आहे.

शिवसेनेच्या गाईडलाईनशिवाय कोणताही निर्णय नाही

जोपर्यंत या प्रकरणात शिवसेना काय भूमिका घेणार आहे, हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत पुढील भूमिका घेता येणार नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केलेले दिसते आहे. शिवसेनेत मुख्यमंत्री बदलाची मागणी कुणी केली असेल तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ती भूमिका ते ठरवतील. आपल्या वैयक्तिक विचारले तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे चांगले नेतृत्व करत असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

चर्चेतून तोडगा निघू शकेल हा विश्वास

अद्यापही राज्यात सध्याची स्थिती पाहता चर्चेतून तोगा निघू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र या प्रकरणात एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झआले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवसेनेची भूमिका ठरल्याशिवाय बोलता येणार नाही, किंवा पुढे काहीही करता येणार नाही असेही त्यांनी स्पषअट केले आहे. आज दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची बैठक असल्याने आज मुंबईत तातडीने परतणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विधान परिषदेत झालेले क्रॉस वोटिंग ही काही नवी बाब नाही, यातून सरकारे प़डत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी हात केले वर

राज्यात विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत दुफळी प्रामुख्याने समोर आली होती. त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर, आता राज्य सरकार अडचणीत असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली आहे, त्यात शिवसेनेचे केवळ १६ आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे. अशा स्थितीत या सरकारचे प्रवर्तक मानले जाणारे शरद पवार हे एकूणच बचावात्मक भूमिकेत दिसत आहेत, त्यामुळे सरकारच्या अस्तित्वाबाबत शंका उपस्थित करण्यास वाव दिसतो आहे.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.