
माझा दोन वर्षांपासून या ठिकाणी स्टॉल होता.दोन वर्षात चार जागेवर फिरवण्यात आले आहे. शेवटी ब्रिजखाली आपण स्टॉल लावला.माझ्या स्टॉलवर गर्दी व्हायची म्हणून कोणी तरी फोटो काढून टाकायचे म्हणून पालिकेने कारवाई केल्याचे डोंबिवलीच्या एकता सावंत यांनी म्हटले आहे. येथे अनेक जण ४० ते ५० वर्षांपासून स्टॉल लावत आहेत. मग मला का अशी भिकाऱ्यासारखी वागणूक असाही सवाल एकता सावंत या तरुणीने केला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या तरुणीचे फिर्याद ऐकल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी काल एकता सावंत यांची भेट घेत तिला दिलासा दिला आहे.
एकता सावंत यांनी सांगितले की माझ्याकडे गर्दी होत होती, त्यामुळे कोणीतरी फोटो काढून टाकायचे आणि पालिका माझ्या स्टॉलवर ॲक्शन घेत कारवाई करायची.माझी तक्रार आजूबाजूचे लोकच करायचे. अनेक वर्षे येथे परप्रांतीपासून सगळ्यांचा व्यवसाय आहे सगळे कमवू शकतात मग मी का नाही मी कोणाची तक्रार करीत नाही मग माझ्यावरती कारवाई का ? असाही सवाल एकता सावंत या तरुणीने केला आहे.
या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी मी त्यांना पैसे दिले होते. मला त्यांचं नाव घ्यायचं नाही.. मला माणुसकी आहे.पालिका माझ्याकडे पावती फाडत नाही. मी त्यांना अनेक वेळा बोलली की माझ्याकडं पावती फाडा. मला अधिकृत व्यवसाय करू द्या. मात्र अधिकारी बोलतात की आज तुम्ही पावती फाडून उद्या व्हिडिओमध्ये बोलून दाखवणार त्यामुळे ती लोक आमच्याकडे पावती पडत नव्हते असेही सावंत यांनी म्हटले आहे.
जिथे माझे पैसे जात असतील तिकडनं पालिका कर्मचाऱ्यांना पैसे पोहोचत असतील. माझं स्टॉल बंद करण्याची वेळ आली. तेव्हा त्यांनी पैसे घेतले. माझ्या मदतीला कोणी उभा नाही. मी फक्त एकटीच उभी राहीले आहे. दोन वर्षांपासून एवढे कष्ट मी केले आणि त्यांनी 20 ते 25 दिवस माझा स्टॉल बंद केला. तरी मी हार मानली नाही.मात्र, त्या दिवशी कारवाई झाली आणि माझे 4000 चे नुकसान झाले, हे माझ्या डोक्यात बसले आणि मी व्हिडिओ बनवला असे एकता सावंत यांनी आपली कैफियत सांगताना म्हटले.
अविनाश जाधव यांनी मदत केली, त्यांनी सांगितलं तू इकडे टपरी टाक आणि बिंदास कर ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. ज्या दिवशी मी लोन घेईल आणि टपरी टाकेल, त्या दिवशीपासून स्टॉल सुरू करेल. पण पुन्हा टपरी टाकल्यानंतर कारवाई करतील याची भीती माझ्या मनात आहे असे एकता सावंत यांनी म्हटले आहे. ती पुढे म्हणाली की अविनाश जाधव यांनी सांगितले की आयुक्तांशी राज ठाकरे स्वतः बोलणार आहेत. त्यावेळेला काही कागदपत्रे बनवून देतील. त्यानंतर मी बिंदास व्यवसाय करू शकते असेही सावंत यांनी सांगितले.
हिंदी वा मराठी कोणी असू दे सगळे भारतीय आहेत. तुम्ही या ठिकाणी स्टॉल लावता. आजूबाजूचे सर्व स्टॉल सुरू आहेत. मात्र, माझ्या दुकानावर गर्दी आहे यात जलेसीपणामुळे माझ्यावरती कारवाई होते. माझ्याकडे गर्दी असली तरी 80 रुपयांचा शोरमा, मी पन्नास रुपयाला विकते हे कोणी बघत नाही. माझा स्टॉल बंद केल्यावरती आजूबाजूवाले हसतात त्यामुळे मला लज्जा निर्माण होते असेही सावंत यांनी सांगितले.