Bhimashankar Sanctuary : बिबट्या हद्दपार; बिबट्याचे वास्तव्य जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरुर भागातील बागायतीत

Bhimashankar Sanctuary : बिबट्या हद्दपार; बिबट्याचे वास्तव्य जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरुर भागातील बागायतीत
बिबट्या
Image Credit source: tv9

या बुद्ध पौर्णिमेला झालेल्या गणनेत जंगलात बिबट्या आढळून आलेला नाही. त्यामुळे भिमाशंकर अभारण्याच बिबट्याचे वास्तव्य संपल्याचेच चित्र समोर येत आहे

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 20, 2022 | 6:48 PM

पुणे : बुद्ध पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंतीचा दिवस. वैशाख शुक्ल पौर्णिमेदिवशी बुद्ध पौर्णिमा (Buddha Pournima) भारत, नेपाळसह जगभरात साजरी केली जाते. भारतामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देशभरातील अभयारण्यांमधील प्राण्यांची गणना केली जाते. वन खात्यातील सरकारी कर्मचारी यांच्यासह वन्यजीव प्रेमींसाठी हा दिवस मोठा कुतूहलाचा असतो. मचाणवर बसून त्यांना जंगलातील प्राणी पाहण्याची संधी मिळते. तसेच शहराच्या जंगलातून बाहेर पडत थेट खर्याखुऱ्या जंगलात जाण्याची संधी मिळते. तर या बुद्ध पौर्णिमेला पुणे वन विभागासह महाराष्ट्रातील सर्व जंगलांमध्ये बुद्धपौर्णिमेच्या रात्री पाणवठ्यांवर बसून वन्यप्राण्यांची मोजणी करण्यात आली. पुणे विभागांतर्गत भीमाशंकर अभयारण्यामध्ये (Bhimashankar Sanctuary) वन्यप्राणीप्रेमींनी वन्यप्राण्यांची गणना केली. याचबरोबर सुपे येथील मयुरेश्वर चिंकारा अभयारण्य आणि सोलापूरमधील नान्नझ येथे ही वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. येथे अनेक वन्यप्राणीप्रेमींना अनेक वन्यप्राणी पाहण्याची संधी मिळाली. मात्र जो वन्यप्राणी पाहण्यासाठी वन्यप्राणीप्रेमी उतावळे असतात तो दिसलाच नाही. तो म्हणजे बिबट्या (Leopard)

भीमाशंकर अभयारण्यामध्ये 14 पाणवठे आहेत. येथे वनविभागाकडून लाकूडफाटा आणि पालापाचोळ्यांचे मचाण करण्यात आले होते. संध्याकाळी प्राण्यांच्या नकळत या मचाणात बसून प्राणिप्रेमींनी वन कर्मचाऱ्यांसमवेत पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांच्या नोंदी घेतल्या. मात्र बिबट्या काही दिसला नाही. त्यामुळे वन्यप्राणीप्रेमींमध्ये भिमाशंकर अभारण्यातुन बिबट्या हद्दपार झाल्याचेच बोलले जात आहे. त्यामुळे राज्याच्या वनविभागावर आता प्रश्न चिन्ह उभे होत असून तो गेला कुठे असाच सवाल वन्यप्राणीप्रेमी आता वनविभागाला विचारत आहेत.

हरिण जातीचे भेकर आणि सांबरांच्या संख्येत वाढ

भीमाशंकर अभयारण्यामध्ये बिबट्याचे खाद्य असणाऱ्या हरिण जातीचे भेकर आणि सांबरांच्या संख्येत वाढ झाल्याचे या गणनेत दिसून आले आहे. मात्र बिबट्या नाही. त्यामुळे बिबट्याने आपला अधिवास बदलला असून त्याचा वावर आता लोकवस्तीत होत असल्याचेच अनेक घटनांवरून दिसून येत आहे.

बिबट्याचे बागायती भागात वास्तव्य

भीमाशंकर अभयारण्यामध्ये बिबट्याचे खाद्य असणाऱ्या हरिण जातीचे भेकर आणि सांबरांच्या संख्येत वाढ झाल्याचे या गणनेत दिसून आले आहे. मात्र ज्यासाठी हे भक्ष वाढवले जात आहे तो बिबट्या मात्र जुन्नर, आंबेगाव , खेड आणि शिरुर तालुक्यातील बागायती भागात वास्तव्य करु लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भागात बिबट्या दिसून आल्याचे लोक सांगतात. तसेच या परिसरात भीतीचे वातावरण ही तयार झाले आहे.

बागायती भागात अन्न पाणी आणि निवारा

भीमाशंकर अभयारण्यामध्ये बिबट्याचे खाद्य मुबलक असल्याचे या गणनेवरून दिसून आले आहे. मात्र असे असतानाही असे का झाले असा प्रश्न वन्यप्राणीप्रेमींसह वनविभागाला ही पडला आहे. तर याचे कारण आता समोर येत असून बागायती भागात बिबट्याला अन्न पाणी आणि निवारा मिळु लागल्याने बिबट्या जंगल सोडून लोकवस्तीलगत शेतीकडे वळाल्याचे दिसून आले आहे.

हे सुद्धा वाचा

बिबट्याचे वास्तव्य संपले

या बुद्ध पौर्णिमेला झालेल्या गणनेत जंगलात बिबट्या आढळून आलेला नाही. त्यामुळे भिमाशंकर अभारण्याच बिबट्याचे वास्तव्य संपल्याचेच चित्र समोर येत आहे. तर बिबट्याच्या वास्तव्याच्या खुनाही हद्दपार झाल्याचे प्राणी जणगणनेतून पुढे आले आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें