AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात 30 माकडांवर कोरोना लसची चाचणी होणार : वनमंत्री संजय राठोड

कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तात्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले (Experiments on Monkeys to develop corona vaccine) आहे.

पुण्यात 30 माकडांवर कोरोना लसची चाचणी होणार : वनमंत्री संजय राठोड
| Edited By: | Updated on: Jun 07, 2020 | 8:17 AM
Share

यवतमाळ : कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तात्काळ विकसीत करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले (Experiments on 30 Monkeys to develop corona vaccine) आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेला 30 माकडांची आवश्यकता आहे. ही 30 माकडं राज्याच्या हद्दितील देण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येणार (Experiments on Monkeys to develop corona vaccine) आहे.

सध्या राज्यात कोरोना विषाणुमुळे होत असलेला प्रादुर्भाव आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकल्पास तातडीने परवानगी देण्याबाबत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी 30 मे 2020 रोजीच्या पत्रान्वये शासनास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार ही माकडं तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहे.

याप्रकरणी अनुभवी मनुष्यबळामार्फत या माकडांना पकडणे, त्यांना कुशलतेने हाताळणे, त्यांना सुरक्षितपणे बाळगणे, पकडलेल्या माकडांना तसेच परिसरातील इतर वन्यप्राण्यांना इजा तसेच त्यांचा दैनंदिन जीवनक्रम विस्कळीत न होऊ देणे, प्रकल्पाचा व्यापारी तत्वावर उपयोग न करणे आदी अटी शर्तींच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत 2 लाख 46 हजार 622 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 6 हजार 946 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 1 लाख 18 हजार पेक्षा अधिक रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातही माकडांवर प्रयोग

कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील शेकडो वैज्ञानिक लस तयार करण्याचा कामाला लागले आहेत. याआधी इस्त्रायल देशाने लस विकसित केल्याचा दावा केला होता. तर ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्सिट्यूटने लस विकसित केल्याचा दावा केला आहे.

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी लसीची चाचणी छोट्या माकडांवर केली आहे. माकडांवर या लसीचा सकारात्मक परिणाम बघायला मिळाल्याची माहिती संशोधकांनी दिली होती. याशिवाय या लसीचा मानवी प्रयोग लवकरच केला जाईल, असंदेखील संशोधकांकडून सांगण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

अमेरिकेत कोरोना लसीचे 20 लाख डोस तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

‘कोरोना’वरील पहिल्या लसीला यशाचे संकेत, अमेरिकेतील ‘मॉडर्ना’ची प्राथमिक चाचणी आशादायक

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.