AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! एकनाथ शिंदे गटाला फडणवीस सरकारचा पहिला झटका; त्या कामांना दिली स्थगिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील तब्बल 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मोठी बातमी ! एकनाथ शिंदे गटाला फडणवीस सरकारचा पहिला झटका; त्या कामांना दिली स्थगिती
| Updated on: Mar 01, 2025 | 6:48 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील तब्बल 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे आता तानाजी सावंत यांच्या काळातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान  जर एखाद्या गोष्टीत अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त असतं अशी प्रतिक्रिया यावर आताचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे.

दरम्यान यावरून आता शिवसेना ठाकरे गटानं सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार  कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  तानाजी सावंत यांच्या आरोग्य मंत्रिपदाच्या कार्यकाळातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली, यावर प्रतिक्रिया देताना कैलास पाटील यांनी म्हटलं की,  ज्यावेळी तानाजी सावंतांनी 3200 कोटीच्या कामांना मंजूर दिली, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात होते. ते उपमुख्यमंत्री होते, मग तेव्हा ते गप्प का होते? असा सवाल कैलास पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील तब्बल 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे. हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. मात्र यावरून आता विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. ज्यावेळी तानाजी सावंतांनी 3200 कोटीच्या कामांना मंजूर दिली, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात होते. ते उपमुख्यमंत्री होते, मग तेव्हा ते गप्प का होते? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.

Follow Us
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद