AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच्या बैठकीपूर्वीच महाराष्ट्रात खलबतं, फडणवीस आणि शिंदे यांच्यात बंदराआड चर्चा; फायनल निर्णय होणार?

राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. एका जागेमुळे हा तिढा वाढला आहे. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत नेत्यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दिल्लीतील नेतेही मध्यस्थी करत असल्याने शिवसेना आणि भाजपमधील जागा वाटपाचा हायव्होल्टेज ड्रामा रंगताना दिसत आहे.

दिल्लीच्या बैठकीपूर्वीच महाराष्ट्रात खलबतं, फडणवीस आणि शिंदे यांच्यात बंदराआड चर्चा; फायनल निर्णय होणार?
एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस
| Updated on: May 26, 2026 | 1:50 PM
Share

राज्यातील विधान परिषद निवडणुकीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. त्यानंतरही काही तोडगा निघालेला दिसत नाही. त्यामुळेच उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असून पुन्हा अमित शाह यांची भेट घेणार आहेत. पण या भेटीपूर्वीच फडणवीस आणि शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेतून तोडगा निघाला नाही तर मग दिल्ली दरबारीच विधान परिषदेचा तिढा सोडवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विधान परिषदेच्या जागेवरून चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही नेते यावर चर्चा करत आहेत. भाजप आणि शिंदे गटात एका जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. त्यावरच आजच्या बैठकीत फोकस असल्याचं सांगितलं जात आहे. आज जर तिढा सुटला नाही तर उद्या अमित शाह यांच्या दरबारात हा तिढा सोडवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्या बैठकीत काय ठरतं? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

एका जागेवरून तिढा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागांवर विधान परिषदेची निवडणूक होत आहे. शिंदे गटाने यातील सात जागांवर दावा केला आहे. शिंदे गटाने भाजपकडे आधीच्या पाच आणि नव्याने वाढलेल्या दोन जागा अशा एकूण 7 जागांवर दावा केला आहे. तर शिवसेनेला केवळ 3 ते 4 जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार, भाजप 12 जागा, शिंदे गट 3 आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळणार आहेत. ठाण्यात भाजपचं बळ वाढलं आहे. त्यामुळे भाजपला ठाण्याची जागा हवी आहे. दुसरीकडे शिंदेंनी बहुजन विकास आघाडीला सोबत घेऊन आपलंही बळ दाखवलं आहे. त्यामुळे नेमका काय निर्णय होतोय याकडे लक्ष लागलं आहे.

कुणाला कोणती जागा हवी ?

भाजप  –

लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, नागपूर, वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर – जालना, सातारा – सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा – गोंदिया, अमरावती

शिवसेना –

ठाणे, यवतमाळ आणि नाशिक

राष्ट्रवादी –

परभणी, हिंगोली आणि रायगड-रत्नागिरी -सिंधुदुर्ग

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट