
Prasad Tamdar: आतापर्यंत अनेक भोंदू बाबांवर कठोर कारवाई करण्यात आलेली असताना पुन्हा एकदा पुण्यातील भोंदू बाबाबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. बाबा मठात महिलांसोबत अश्लील वर्तवणूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. बाबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. मुळशी तालुक्यातील सुस गावातील स्वामी समर्थ बिल्डिंगमध्ये त्याचा मठ आहे. अनेक महिलांना आंघोळ घालताना, त्यांच्यासोबत विचित्र डान्स करताना, महिलांची ओटी भरतानाचे बाबाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. केलंले कृत्य समोर आल्यानंतर बाबा आता येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
प्रसाद तामदार हा स्वतःला दिव्य शक्ती प्राप्त झालेला बाबा म्हणून प्रसिद्ध होता. त्याने अनेक भक्तांचे अश्लील व्हिडीओ देखील रेकॉर्ड केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ज्या ॲपच्या माध्यमातून त्याला दिव्य शक्ती प्राप्त झाली होती, त्याच ॲपने बाबाची पोलखोल केली आहे.
बाबा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असून पोलीस संबंधित प्रकरणी कसून चौकशी करत आहेत. पोलिसांच्या तपासादरम्यान एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. बाबाच्या लॅपटॉपमध्ये भक्तांचे असंख्य अश्लील व्हिडीओ असल्याचं समोर आलं आहे. भोंदू बाबा वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीया, गर्लफ्रेंड किंवा इतर महिलांसोबत भक्तांना शारीरिक संबंध ठेवताना मोबाईलद्वारे बघायचा. एवढंच नाही तर, त्याने अनेक स्वतःच्या लॅपटॉपमध्ये अनेक व्हिडीओ देखील सेव्ह केल्या माहिती समोर येत आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, बााबला पॉर्न व्हिडीओ बघायची देखील सवय होती… असं उघड झालं आहे. प्रसादच्या लॅपटॉपमध्ये अनेक पॉर्न व्हिडीओ असल्याचे फोल्डर पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत. एवढंच नाही तर, अनेक पुरुष भक्तांसोबत देखील त्याने अनैसर्गिक कृत्य केलं आहे.
बाबाने अनेकांची फसवणूक देखील केली आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अनेक तरुणांसोबत बाबाने थेट अनैसर्गिक कृत्य केलेलं आहे. बाबाच्या या कृत्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही, म्हणून अनेक जण गप्प होते. परंतु, बाबाचे काळे कृत्य अखेर समोर आलं आहे. तामदार याचा पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात मोठा भक्त परिवार असल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.