Barshi : महावितरणचा गलथान कारभार बेतला जीवावर, पावसाने उघडीप दिल्यानंतरही दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष

| Updated on: Jun 02, 2022 | 4:16 PM

बार्शी शहरासह तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत तर झाले होतेच पण अनेकांच्या घरातही पाणी शिरले होते. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने जीर्ण झालेल्या विद्युत तारा तुटल्या होत्या. असाच प्रकार शहाराला लागूनच असलेल्या कासारवाडी शिवारात घडला.

Barshi : महावितरणचा गलथान कारभार बेतला जीवावर, पावसाने उघडीप दिल्यानंतरही दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष
विद्युत तारेच्या स्पर्शामुळे शेतकऱ्याचा मृत्यू
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बार्शी : महावितरणच्या गलथान कारभारामुळे उसाचे फड, कडब्याच्या गंजी जळून खाक झाल्या आहेत. यंदाच्या वर्षात अशा घटनांमध्ये वाढ झाली असून इथपर्यंत ठीक होते पण (Solapur District) सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे तर (MSEB) महावितरणच्या कारभरामुळे सर्वसामान्यांना शॉक बसेल अशीच घटना घडली आहे. महावितरणच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील कासारवाडी येथील शेतकऱ्यास आपला जीव गमवावा लागला आहे. बार्शी शहर व परिसरात दोन दिवसांपूर्वी (Heavy Rain) पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, झाडेही कोसळली तर विद्युत ताराही जमिनीवरच पडल्या होत्या. दोन दिवसानंतरही विद्युत प्रवाह सुरु असलेल्या तारा ह्या शेत शिवारात पडलेल्या होत्या. दरम्यान, शेतावर गेलेल्या सतीश शिवाजीराव गुंड (वय 57) यांचा जामिनीवर पडलेल्या ताराला स्पर्श झाला आणि यामध्येच त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे महावितरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कारण्याची मागणी भाजपाचे राजेंद्र मिरगणे यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी झाला होता पाऊस

बार्शी शहरासह तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत तर झाले होतेच पण अनेकांच्या घरातही पाणी शिरले होते. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने जीर्ण झालेल्या विद्युत तारा तुटल्या होत्या. असाच प्रकार शहाराला लागूनच असलेल्या कासारवाडी शिवारात घडला. शेतामध्ये जमिनीवर पडलेल्या विद्युत तारामध्ये विद्युत प्रवाह सुरुच होता. अशातच सतीश गुंड यांचा त्या तारेला स्पर्श झाला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यूही झाल्याची घटना घडली आहे. मात्र, दोन दिवसाच्या आवधीमध्ये दुरुस्ती कामे अन्यथा त्या भागातील विद्युत पुरवठा तरी खंडीत करणे गरजेचे होते.

विद्युत खांबावरील तारा जमिनीवर

वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांबावरील तारा जमिनीवर तुटून पडल्या आहेत. दरम्यानच्या दोन दिवसांमध्ये ही दुरुस्तीची कामे होणे अपेक्षित होते शिवाय दुरुस्ती झाली नाही तर किमान त्या भागातील विद्युत पुरवठा खंडीत करणे गरजेचे होते. महावितरणमधील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.

हे सुद्धा वाचा

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

महावितरणच्या कारभारामुळे सतीश गुंड यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आता नातेवाईकांमधून होत आहे. सतीश गुंड हे भाजपाचे नेते राजेंद्र मिरगणे यांचे मेहुणे होते. अशाच महावितरण अधिकारांच्या चुकीमुळे दोन जणांचे जीव धोक्यात गेले आहेत त्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनी केली आहे.