AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जमाफीची आनंदवार्ता धडकली! कागदपत्र ठेवा तयार… या दिवशी होणार फायदा… तारीख आली समोर दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता धडकली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा महायुती सरकारने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याविषयीची माहिती दिली आहे. आता ती तारीख समोर आली आहे. या दिवशी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे. काय आहे ती मोठी अपडेट

कर्जमाफीची आनंदवार्ता धडकली! कागदपत्र ठेवा तयार... या दिवशी होणार फायदा... तारीख आली समोर दत्तात्रय भरणे यांची मोठी माहिती
येत्या दहा दिवसात कर्जमाफी Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 31, 2026 | 2:13 PM
Share

Dattatray Bharane on Farmer Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची आनंदवार्ता धडकली आहे. 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन गेल्यावर्षी राज्य सरकारने विधानसभेत दिले होते. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची घोषणा केली होती. त्यानुसार यावर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पातही याविषयची तरतूद करण्यात आली. तर आता कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीची तारीखच जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कागदपत्रं तयार ठेवणे आवश्यक आहे. तर सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार आणि नियमानुसार त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ॲग्री स्टॉकवर नाव नोंदणी आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

येत्या 10 दिवसात कर्ज माफी

राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी घोषणा केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी येणाऱ्या 10 दिवसात कर्ज माफी केली जाईल असे जाहीर केले. त्यांच्या वक्तव्यामुळे शेतकरी पेरणीपूर्वीच आनंदून गेला आहे. मृगाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या डोईवरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना काय?

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची घोषणा केली. त्यानुसार, 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बँकेने दिलेले दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज राज्य सरकार माफ करणार आहे.

बँकांना सुद्धा होणार मोठा फायदा

राज्य सरकारच्या कर्जमाफीचा केवळ शेतकर्‍यांनाच नाही तर सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांनाही तसेच पीक कर्ज देणाऱ्या पतसंस्थांना मोठा फायदा होईल. सध्या अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यांना पीक कर्ज माफीचा मोठा फायदा होईल. त्यांचे येणं, मोठी थकबाकी वसूल होईल. शेतकर्‍यांच्या खात्यावरील कर्ज माफ होणार आहे. थकीत कर्ज शासन भरणार असल्याने बँकांची वसूली होणार आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तर थकीत कर्ज खाती निरंक होणार असल्याने बँकांची पत सुधारणार आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट