AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एसटी बसचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

मोठी बातमी समोर येत आहे, जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंजाळवाडी परिसरात कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! एसटी बसचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी
एसटी बसचा भीषण अपघात Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 9:27 PM
Share

पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अन्य 25 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली, स्थानिकांच्या मदतीने या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समोर चाललेल्या चारचाकी गाडीला ओव्हरटेक करताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस खड्यात पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना  पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुजाळवाडी परिसरात घडली आहे.  कल्याण -अहिल्यानगर महामार्गावर हा भीषण एसटी अपघात घडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार समोर असलेल्या चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे. एसटी बस खड्ड्यात पलटी झाली. या अपघातामध्ये चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

25 प्रवाशी जखमी

दरम्यान या अपघातामध्ये 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली. स्थानिकांच्या मदतीने तातडीने जखमींना आळेफाटा परिसरातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.  या घटनेत बसचा वाहक देखील जखमी झाला आहे.

वाहतूक विस्कळीत 

समोर असलेल्या चारचाकी वाहनाला ओव्हर टेक करण्याच्या नादात हा अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि एसटी बस थेट खड्ड्यात पलटी झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, चालक आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.  तसचे 25 जण जखमी झाले, दरम्यान अपघात घडल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्यानं काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.  त्यानंतर ती पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली. दरम्यान या अपघातामध्ये बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. चालकाची घाई प्रवाशाच्या जीवावर बेतली.

Follow Us
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना
तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना इशारा, काय म्हणाल्या?
सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह...
Vinayak Raut | सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह विभागाकडून...
परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या...
Abhijeet Dipke | परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या आंदोलनानंतर अभिजित दिपकेंचा सरकारला थेट इशारा
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं विश
Eknath Shinde Video | गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं लक्ष
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे यांचं मोठं आवाहन काय?
नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव; पूरात दिसल्या नाहीत
Nalasopara | पूरात दिसल्या नाहीत, आता श्रेय घ्यायला आल्या; नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊत
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
Mulund Railway Station | एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक...नेमकं काय घडलं?