AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचा अपघात झाला आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू
Pune AccidentImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 3:19 PM
Share

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर फॉर्च्युनरमधील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये प्रकाश भेगडेंच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, या अपघातामधील जखमी लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.  विकास अर्जुन पारखी असं मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. तर या अपघातामध्ये फॉर्च्युनरमधील तिघे जण जखमी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे देखील या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, स्थानिकांनी या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

गुन्हा दाखल 

दरम्यान या अपघात प्रकरणात मुळशीतील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर फॉर्च्युनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान 

दरम्यान हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. रिक्षा आणि फॉर्च्युनरची धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही वाहन मोठ्या प्रमाणात डॅमेज झाले आहेत. तर या अपघातामध्ये रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रिक्षाचालकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?